Home जळगाव मुलगाच निघाला आईचे दागिने चोरणारा चोर ??

मुलगाच निघाला आईचे दागिने चोरणारा चोर ??

214

रावेर (शरीफ शेख)
रावेर पो स्टे हद्दीतील निरुळ या गावी फिर्यादी सौ सयाबाई योगराज। खैरे 50 वर्ष रा निरुळ यांचे घराला कुलूप असतांना दि15/12/2020 रोजी रात्री घरफोडी झालेने घरातील रोख 20000/-रुपये,35 000/-रुपये किमतीची 7 ग्रॅमची सोन्याची अंगठी,30000/-रुपये किमतीच्या चांदीच्या दोन पाटल्या व एक चांदीचे कडे असा एकूण 85000/- रु चा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने घरफोडी करून चोरून नेला अशी फिर्याद दिलेने गुन्हा दाखल झाला होता, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शन खाली psi मनोहर जाधव ,पो कॉ जगदीश पाटील,पो ना महेंद्र सुरवाडे, पो कॉ प्रमोद पाटील,पो कॉ सुरेश मेढे,पो कॉ सुकेश तडवी,पो कॉ महेश मोगरे,कुणाल सोनवणे,विशाल पाटील, प्रमोद पाटील या पोलीस पथकाने गोपनीय बतमीवरून फिर्यादीचा मुलगा(आरोपी)जितेंद्र योगराज खैरे यास ताब्यात घेऊन नमुदचा गुन्हा उघडकीस आला असून चोरी झालेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून नमूद मुद्देमाल फिर्यादिस परत करण्याचा मा JMFC श्री राठोड सो रावेर यांनी आदेश दिलेने रोख 20000/-रुपये व दागिने फिर्यादिस पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी परत करीत असता फिर्यादी म्हणाल्या की,साहेब मला हे वाटले की माझा चोरीस गेलेला मुद्देमाल मला परत मिळेल,व माझाच मुलगा चोर निघेल हेही स्वप्नात विचार सुद्धा केला नव्हता असे म्हणून दागिने हातात घेऊन दागिन्यांकडे पाहून आनंदा अश्रू निघाले तेव्हा उपस्थित पोलीस सुद्धा पाहतच राहिले.