फायनान्स कंपनीचा परवाना रद्द करून, कंपनीला जिल्ह्यातून हद्दपार करणाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.
यवतमाळ – कोरोना संसर्गजन्य रोगामुळे संपुर्ण राज्यासह देशाची आर्थिक परिस्थिती अत्यंत खालावलेली असतांना मध्यमवर्गीय लोकांसमोर पैशांचा प्रश्न अधिक जटील बनली असतांना कर्ज वसुलीसाठी तगादा लावणाऱ्या उत्कर्ष स्मॉल फायनान्स कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी काल स्वाभिमान कामगार संघटनेचे अध्यक्ष निरज वाघमारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
हाताला काम नसल्या कारणाने सामान्य वर्गांचे आर्थिक स्त्रोत पुर्णपणे बंद आहेत . परंतु याही परिस्थितीत जिवनाचा गाडा हाकण्याकरिता पैशांची थोडीफार मदत व्हावी याकरिता हे लोक मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या दारात जाऊन थोडीफार कर्जाची मागणी करतात . आपल्या छोट्या छोट्या गरजा भागविण्यासाठी महिलांना त्वरीत कर्जाची रक्कम मिळते शिवाय दर आठवड्याला कर्जाचा हप्ता भरायचा या तत्वावर मायक्रो फायनान्स कंपन्या कर्ज वितरण करत असतात . याच परिस्थितीचा फायदा घेत मायक्रो फायनान्स कंपन्या महिलांना कमीत कमी व्याजाचे आमिष दाखवून कर्ज देऊ करतात . हा प्रकार ग्रामीण भागात अधिक असून जिल्ह्यात हजारो महिला या मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या ग्राहक आहेत . मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून प्रारंभी महिलांना आकर्षक कर्जाचे आमिष देत त्यांचे तिन – तिन तर पाच – पाच सदस्यांचे गट पाडून कर्जाचे वितरण केल्या जाते . ग्रामीण भागातील महिलांच्या असुशिक्षीतपणांचा फायदा घेत या आकर्षक कर्जावर अव्वाच्यासव्वा दराने व्याजदर लावून पुढे वर्षानुवर्ष या कर्जाची मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या एजंटकडुन वसुली केल्या जाते . या कर्ज वितरणवेळी महिलांकडुन कर्जाचा अर्ज भरुन घेण्यात येतो या अर्जामध्ये अनेक अटी व नियमांमध्ये महिलांना बंधनात अडकविण्यात येते . तात्काळ कर्ज मिळते या कारणास्तव गरजेसाठी महिलांनी डोळे झाकुन या अर्जावर स्वाक्षरी व अंगठे लावतात . असाच काहीसा प्रकार शहरातील वाघापूर परिसरातील राऊत नगर भागात असलेल्या उत्कर्ष स्मॉल फायनान्स आणि बँकने चालविला आहे . शहरातील अनेक महिलांना कमी व्याजदराचे आमिष देऊन हजार रुपयांचे कर्ज देऊ की नाही मध्यंतरी लॉकडाऊन आणि कोरोनामुळे रोजमजुरी करणाऱ्या महिला वर्गावर स्वाभिमान ‘ कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष निरज वाघमारे नोंदणी क्रमांक : उपासमारीची वेळ आली असतांना कर्जाचे हप्ते फेडणे कठिण होते ही सर्व परिस्थिती उत्कर्ष स्मॉल फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना व वसुली अधिकाऱ्यांना माहित असतांना सुध्दा या कंपनीमार्फत महिलांना वसुलीसाठी रोज तगादा लावणे त्यांना आर्वच्च भाषेत शिवीगाळ करणे किंवा इतर धमक्या देणे या कंपनीने सुरु केले . आपण कर्जदार असल्या कारणाने महिला व घरातील कोणताही व्यक्ती कंपनीला प्रतिउत्तर देण्यास धजत नव्हते . या सारख्या अनेक कंपन्यांच्या विरोधात सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी आवाज उठवल्यानंतर हा प्रकार काहीश्याप्रमाणात बंद झाला मात्र यवतमाळ जिल्ह्यातील परिस्थिती पाहता ही परिस्थिती जाशाच तशी आहे . लॉकडाऊन नंतर कर्जफेड करण्यासाठी थकीत हप्त्यांची वसुली करण्यासाठी मायक्रो फायनान्सच्या कर्मचाऱ्यांची जबरदस्ती सुरु झाली . आधीच ढासाळलेली अर्थव्यवस्था आणि त्यातच कोरोनाचा कहर यामुळे या महिला वेठीस धरल्या गेल्या आहेत . उदरनिर्वाह करण्यासाठी पैसे उपलब्ध नसलेल्या माहिलांनी कर्जाचे हप्ते ते ही अवाढव्य व्याजासहित कशे भरावे हा प्रश्न आता आ वासुन उभा आहे . मायक्रो फायनान्स कंपन्यांची ही वसुली वेळेत न झाल्यास किंवा या महिलांनी मुदतीच्या आत कर्जाचे हप्ते या कंपन्यांकडे जमा न केल्यास मायक्रो फायनान्स कंपन्यांचे एजंट या महिलांच्या घरी जाऊन अरेरावी व अर्वाच्च भाषेचा वापर करत महिलांना अपनित केल्या जाते याच बरोबर तुम्ही हे पैसे न दिल्यास आम्ही तुमच्या घरातील वस्तु उचलुन नेऊ व त्याच बरोबर तुमच्या घरावर ताबा मारु तर कुठे – कुठे ही वसुली न झाल्यास या महिलांच्या घरावर कंपन्यांचे फलक व पेंटद्वारे कंपन्यांचे कर्ज असल्याचे लिहल्या जात आहे . यामुळे या महिलांना व त्यांच्या कुटुंबियांना मोठा मनस्ताप होत आहे . त्यामुळे आपण या सर्व प्रकाराची गांभिर्यपुर्ण दखल घेऊन संबंधित कंपनीची या कंपनीच्या वसुली अधिकाऱ्याची व एजंटची याच बरोबर या कंपनीच्या कार्यालयातील संगणक व दस्ताऐवजांची तपासणी केल्यास सर्व सत्य उघड होईल . याकरिता आपण आपल्या कार्यालयामार्फत पथक नेमुन या कार्यालयावर छापे मारुन चौकशी करावी व या कंपनीवर कठोर कारवाई करुन जिल्ह्यात या कंपनीस हद्दपार करावे अशी मागणी या निवेदनातून स्वाभिमान कामगार संघटनेचे अध्यक्ष निरज वाघमारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
यावेळी संघटनेचे रोशन मस्के, हरीश कामारकर, हृषीकेश सावळे, वैभव धामनवार, प्रणव राठोड, सनी ढाकरगे, महेश वाघमारे, ओम चंद्रवंशी, तौफिक पठाण, साहिल खान, विप्लव वाघमारे, रशीद शेख, जयंत वाघमारे, अरमान खान, यश किर्तक, देवानंद पंधरे, सोहेल खान यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.