मुक्ताईनगर शहरातील प्रस्तावित बिनशेती (एन.ए) थांबून येथून कब्रस्तान करीता आरक्षित व्हावी
रावेर (शरीफ शेख)
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर शहरातील गट नं.373/1 मध्ये प्रस्तावित बिनशेती(एन.ए)थांबुन येथे मुस्लिम कब्रस्तान करिता आरक्षित करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम)मंत्री मा.एकनाथ शिंदे साहेब यांच्या मुम्बई येथे निवासस्थानी भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की,मुक्ताईनगर शहरातील मुस्लिम बांधवांना ची लोकसंख्या 10000(दहा हजार)झालेली आहे.आणि मुक्ताईनगर गावाचे तीन टप्प्यात पुनवर्सन झालेले आहेत.त्यात फक्त पहिल्या टप्प्यात 20 आर जागा ही मुस्लिम कब्रस्तान साठी देण्यात आलेली आहे.त्याच प्रकारे दुसरी जागा सुद्धा कब्रस्तान करिता देण्यात आलेली आहे.परंतु त्यावर चाळीस ते पन्नास वर्षापासून हिंदू बांधवांनी अतिक्रमण करून पक्के बांधकाम केलेले आहे.ते काढणे शक्य नाही कारण ती जागा हिंदू लोकांच्या रहिवास शेजारी आहे.त्याचप्रमाणे सदर जागा लहान(कमी) असल्यामुळे आज रोजी कोणी जर मृत्यू पावला तर सर्व समाजासमोर एकाच प्रश्न निर्माण होतो की आता हे प्रेत कुठे दफन करावे.म्हणून कब्रस्तान ला लागूनच गट नंबर 373/1 सदर गट नंबर हा मुस्लिम कब्रस्तान(दफनभूमी) करिता आरक्षित करण्यात यावा. सदर निवेदन मध्ये म्हटले आहे की,मा.ना.एकनाथ शिंदे साहेब आपण मुक्ताईनगर येथील मुस्लिम समाजाची लोकसंख्या विचारात घ्यावी व भविष्यात प्रेत दफन करण्यासाठी जागाच शिल्लक नाही तर प्रेतांची विटंबना होऊन सदर समाजात संतापाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही तरी अल्पसंख्यांक समाजाचा विचार करून व भविष्याचा विचार करून सदर गट हा अत्यंत सोयीचा व मुस्लिम कब्रस्तान ला लागुन व मुस्लीम वस्तीत लागून असल्यामुळे या गटाला अंतिम एन.ए.(बिनशेती) परवानगी न देता येथे मुस्लिम समाजाच्या कब्रस्तान साठी शासन स्तरावर कार्यवाही होऊन ही जागा मुस्लिम कब्रस्तान साठी आरक्षित करण्यात यावी अशी मागणी मुबई येथे महाराष्ट्र राज्य चे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री मा.ना.एकनाथ शिंदे याच्या कडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.सदर निवेदन सादर करताना विधानसभा संपर्क प्रमुख मा.चव्हाण साहेब,शेख शकुर जमादार,आसिफ खान इस्माईल खान,अफसर खान,हकीम चौधरी,सलीम खान,शकील मेंबर अदि उपस्थित होते.