Home महत्वाची बातमी आष्टी तालुक्यातील अंतोरा व थार येथे आहे काँग्रेस मध्ये तळेगाव ग्रामपंचायत मध्ये...

आष्टी तालुक्यातील अंतोरा व थार येथे आहे काँग्रेस मध्ये तळेगाव ग्रामपंचायत मध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता

148

रविन्द्र साखरे – आष्टी 

आष्टी / वर्धा  – जिल्ह्यातून महत्वाची समजली जाणारी ग्रामपंचायत म्हणजे तळेगाव ग्रामपंचायत च्या निवडणुकीचे निकाल हाती लागले असुन या सर्वात महत्वाच्या ग्रामपंचायत वर भारतीय जनता पक्षाने आपला झेंडा रोवला आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नऊ उमेदवारांना यश आले असून चार जागा गुरुदेव पॅनल ला ,तीन जागा काँग्रेस पॅनल ला जोरे पॅनल ला एक जागा मिळाली असून सर्वाधिक नऊ उमेदवार विजयी झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या गटाला या निवडणुकीत यश संपादन करता आले आहे.

विजयी उमेदवार रैली

अंतोरा येथे काँग्रेस ला एकहाती सत्ता मिळाली असून या ठिकाणी पूर्ण नऊ जागी काँग्रेस चे उमेदवार विजयी झाले आहे. थार येथे सहा जागी काँग्रेस चे उमेदवार निवडून आले असून तीन जागी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झाले.