Home विदर्भ कार-दुचाकीच्या अपघातात बहिन भाऊ जखमी , महामार्ग ६ वरील तळेगांव टि पाईंटवरील...

कार-दुचाकीच्या अपघातात बहिन भाऊ जखमी , महामार्ग ६ वरील तळेगांव टि पाईंटवरील घटना

330

वर्धा – तळेगांव (शा.पं.) : येथील महामार्ग ६ वरील टि.पाईंटवर कार व दुचाकीच्या अपघात झाला. यात दुचाकीवरील बहिन भाऊ जखमी झाले. जखमीला आर्वी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हा अपघात दुपारी साडे चार वाजता झाला असून कार मधील चार प्रवासी थोडक्यात बचावले.प्राप्त माहितीनुसार, एम. एच. ३२ ए. डी ४२९८ क्रमांकाच्या दुचाकीने नामदेव गणेश राठोड (२६) व मंदा जाधव (२१) हे बहिन भाऊ मोर्शी कडून आर्वी तालुक्यातील पाचोड या गावी जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरील तळेगांव टि. पाईंटवरुन रोड आेलांडत असताना नागपुर येथुन कॅन्सरचा पेशंट तपासनीकरुन अमरावती कडे जात असलेल्या एम. एच. २७ बी.एफ.०३१७ क्रमांकाच्या कार समोर अचानक आल्याने दुचाकीला धडक बसुन दुचाकी वरील बहिन भाऊ जखमी झाले तर दुचाकी ला वाचवण्याच्या नादात कार रोड लगतच्या बोर्डावरील लोखंडी पोलला व तेथे उभ्या असलेल्या वाहनांना धडकण्यापासुन थोडक्यात बचावली त्यामुळे कारमधील सुद्धा चार जन थोडक्यात बचावले. अपघातात दुचाकीचा व कारचेही नुकसान झाले. या अपघातात दुचाकीवरील नामदेव राठोड (२६) व मंदा जाधव (२१) रा पाचोड ता. अार्वी हे बहिन भाऊ जखमी झाले . घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून नागरिकांच्या मदतीने जखमींना पोलीसांच्या वाहनाने रुग्णालयाकडे रवाना केले. या घटनेची नोंद तळेगांव पोलिसांनी घेतली आहे.