संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जिपनाने अपघात होत असल्याने ठेकेदारवर कार्यवाही करा ..
खडकी चौकात दिशा फलक लावा …
राष्ट्रवादि युवक कॉंग्रेसच्या उपाध्यक्ष चे बांधकाम विभागाला निवेदन ..
रविन्द्र साखरे – आष्टी (श )
वर्धा – तालुक्यातील खडकी ते खंबित बेलोरा मार्गावरील रस्त्याचे बरेच दिवसापासून काम सुरू आहे परंतु काही भाजप नेत्याकडुन बांधकाम बंद करण्यात आले होते बंद काम केल्यानंतर वाहकाना त्रास होत असून बरेच ठिक ठिकाणी खड्डे पडल्याने अपघात सुद्धा होत आहे त्यामुळे काही वाहकांचे अपघात होवून मृत्यू सुद्धा झाले आहे परंतु झोपेत असलेल्या बांधकाम विभाग संबंधित चौरसिया ठेकेदार ला जागे करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता राजकीय नेते व जेष्ठ श्रेष्ठ नागरिकाकडून सुद्धा बांधकाम विभागाला माहिती देवून रस्त्यांचे बांधकाम पूर्ण काम करण्यासाठी मागणी केली होती परंतु काही महिने लोटून सुद्धा मागणी केलेल्या नागरिकांच्या मागणी ला बांधकाम विभागाकडून केराची टोपली दाखवण्यात आली आहे परंतु रस्त्याचे बांधकाम करण्यात आले नाही त्यामुळे मोर्शी कडून वळन रस्ता असल्याने मोर्शी ते खडकी रस्ताने बेलोरा खबीत अंबिकापूर अंतोरा किन्हाळा व खडकी असे गाव लागत आहे त्यामध्ये अंतोरा सर्कल येत असून सतत दळणवळण सुरु असतात मोर्शी कडे बसेस ट्रक ट्रक्टर ॲटो टु व्हिलर असे इतर वाहने सुरू असतात व तळेगाव हायवे कडून येणारे वाहन मोर्शी कडे येतात त्यामुळे बरेच गावांचा मोर्शी बाजारपेठ ला संपर्क येतो सतत वाहन मोर्शी कडे सुरू असतात त्यामध्ये रस्त्याने बांधकाम सुरु होते परंतु अर्थव्यवस्थेत बांधकाम झाल्याने रस्त्यावर पूर्णपणे बांधकाम झाले नाही त्यावर मोठ मोठ्या प्रकारचे गोटे असल्याने खड्डे पडले आहे वाहकास खड्डाचा अंदाज येत नसल्याने सतत अपघात होत आहे तसेच खडकी चौकात दिशाफलक नसल्याने वाहकास अतिशय त्रास सहन करावा लागत दुसऱ्या मार्गाने जात परत चौकात येवून रस्त्याचे नागरिकाना विचारना करून मार्गाने जावे लागतात यामध्ये सुद्धा बरेच अंतराचे पायपीट करावे लागतात अशा नाहक त्रास नागरिकाना सहन करावे लागतात म्हणून याबद्दल संबंधित ठेकेदार यांच्या हलगर्जि पणाने अपघात होत असल्याचा आरोप राष्ट्रवादि कॉंग्रेस चे तालुका युवक अध्यक्ष शुभम नागपुरे उपाध्यक्ष आशिष वाघ शाखा प्रमुख पवन नागपुरे व इतर पदाधिकारी कडून करण्यात आला असून राष्ट्रवादि कॉंग्रेसचे उपाध्यक्ष आशिष वाघ यांच्या कडून उपविभाग बांधकाम विभाग आष्टी येथे निवेदन देवून तात्काळ रस्त्याचे बांधकाम पूर्ण करावे व संबंधित ठेकेदार यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी करून अन्यथा तीव्र आंदोलन येत्या दोन दिवसांत करण्यात येइल असा इशारा सुद्धा यावेळी दिलेला निवेदनातुन केला आहे याकडे सर्व खडकी अंतोरा खंबित बेलोरा व इतर गावातील नागरिकांचे लक्ष लागले आहे