Home महत्वाची बातमी मोटार सायकल चोरटा गजाआड , “चार दुचाकी जप्त”

मोटार सायकल चोरटा गजाआड , “चार दुचाकी जप्त”

193

टोळी विरोधी पथक , स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची कार्यवाही….!!

रवि माळवी

यवतमाळ , दि. १६ :- चोरी केलेल्या मोटारसायकल विक्री करण्या करीता जात असतांना आरोपीस टोळी विरोधी पथक व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पथकाने सापळा रचून अटक केली. पोलीसांनी ही कारवाई दिनांक १४ जानेवारी रोजी बोरीसिंह येथे केली.
आकाश विनोद मेश्राम (२५) रा.बोरीसींह असे अटक केलेल्या चोरट्या आरोपीचे नाव आहे. दिनांक १४ जानेवारी रोजी टोळी विरोधी पथक, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ येथील सहाय्यक पेलीस निरीक्षक मिलन कोयल व त्यांचे पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार चोरटा आरोपी ईसम हा चोरीची होन्डा शाईन मोटारसायकल क्र.एम.एच.२७ एएन ६६४० या वाहनावर अकोला बाजार कडून बोरीसिंह येथे येत होता. तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलन कोयल व त्यांचे पथकाने बोरीसिंह येथे पंचासह रवाना होवून सापळा रचून थांबले असता माहिती प्रमाणे वर्णनाची मोटार सायकल चालवीत बोरीसिंह गावाकडे येत असतांना आरोपी चोरटा हा मिळून आल्याने त्यास व त्याचे ताब्यातील मोटार सायकल व कागदपत्रांबाबत विचारपुस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. वरुन सदर मोटार सायकल ही चोरीची असल्याचा संशय आल्याने पंचासमक्ष जप्त करुन आरोपीस ताब्यात घेवून त्याचेकडे अधिक विचारपुस केली असता त्याने चोरीच्या आणखी तिन मोटार सायकल त्याचे घरी गोठ्यामध्ये ठेवल्या असल्याचे सांगीतले. त्याचे घराचे बाजूला असलेल्या गोठ्यामध्ये २ होंडा शाईन व एक होंडा कंपनीची सिबी युनिकॉन अशा तीन मोटार सायकल मिळून आल्याने जप्त करण्यात आल्या.

सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलन कोयल व त्यांचे पथकाने आरोपी याचेकडून चोरीच्या व संशयास्पद असलेल्या एकुण ४ मोटार सायकल किंमत एकुण १ लाख ६० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन आरोपीविरुध्द भादंवि कलम १२४ मपोका अन्वये वडगांव पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद केला आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक एम.राज कुमार, अपर पोलीस अधिक्षक नूरुल हसन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदिप शिरस्कर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलन कोयल, ऋृषी ठाकुर, संजय दुबे, योगेश गटलेवार, गणेश देवतळे , अमोल चौधरी, जयंत शेंडे, प्रतिक्षा केने सर्व टोळी विरोधी पथक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी पार पाडली.