Home जळगाव खिरवड विद्यालयात रंग तरंग स्नेह संमेलन उत्साहात संपन्न…

खिरवड विद्यालयात रंग तरंग स्नेह संमेलन उत्साहात संपन्न…

189

शाळांच्या विकासासाठी महा विकास आघाडी सरकारने केला प्रकल्प तयार
आमदार – शिरीष चौधरी

शरीफ शेख

रावेर , दि. १७ :- विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व विकास केवळ पुस्तकी ज्ञानच नाही तर इतर कौशल्य सुध्दा उपयोगी ठरतात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी इतर कौशल्य विकसित करून आम्ही कुठे कमी पडत नाही हे दाखविले पाहिजे. मराठी माध्यमांच्या शाळा सुध्दा आता अभ्यासोत्तर कार्यक्रम राबवून इतर माध्यमांची बरोबरी करत आहेत . शाळांच्या विकासासाठी महा विकास आघाडीच्या सरकारने एक प्रकल्प तयार केला असून शाळांचा विकास घडवून आणला जाणार आहे असे प्रतिपादन खिरवड ता. रावेर येथील विकास माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले .
यावेळी प्रमुख पाहुणे जि.प. अध्यक्ष सौ . रंजना पाटील यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दुर राहावे व पालकांनीही मोबाईल आपल्या पाल्याला देवू नये . असे आवाहान त्यांनी केले .
या स्नेहसंमेलनात मराठी गिता बरोबर भारूड , बेटी बचाव बेटी पढाव , बालविवाह , मुक अभिनय सारख्या नाटिका सादर केल्या या कार्यक्रमात जवळ जवळ पन्नास मुलामुलींनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलाने झाली प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक जे. के. पाटील यांनी केले .व्यासपिठावर प्रमुख पाहुणे आ. शिरीष चौधरी जिप अध्यक्ष सौ . रंजना पाटील, मुख्याध्यापक तुकाराम बोरोले एन.व्ही. पाटील पी .एल. नरवाडे, भैया साहेब पवार डॉ शांताराम पाटील , ललीत चौधरी शाळेचे चेअरमन कडू पाटील जिजाबराव चौधरी ,जितेंद्र पाटील भिमराव पाटील ,शालीकग्राम लासुरकर कमलाकर पाटील , डॉ . राजेंद्र पवार उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेखर पाटील व आभार नगिन इंगळे यांनी मानले .

Previous articleबोगस डॉक्टर वर कार्यवाही
Next articleमहिलांसाठी आहार साक्षरता काळाची गरज.!
editor
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.