Home विदर्भ महिलांसाठी आहार साक्षरता काळाची गरज.!

महिलांसाठी आहार साक्षरता काळाची गरज.!

149

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा , दि. १७ :- आजही विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण भागातील स्त्रिया विरोधात वैफले प्रार्थना प्रथा परंपरा व चुकीच्या जीवनशैली सततचे उपवास या कारणामुळे रक्त शयाने ग्रस्त आहे त्यांच्या दैनंदिन आहारात पोषण तत्त्वाचा अभाव असतो महिलांनी आहार साक्षरता वाढवून समतोल आहार करावा. असे आव्हान सौ चंद्रभागा वरकड यांनी केले.
इंदिरानगर येथे प्राथमिक शाळेत डॉक्टर आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क वर्धा च्या विद्यार्थ्यात तर्फेक्षेत्र कार्य अंतर्गत महिलांचे आरोग्य या विषयावर चर्चा सत्र आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनीता ताडाम तर प्रमुख अतिथी म्हणून शीला वैद्य मनीषा म्हैसकर प्राध्यापक काकडे यांची उपस्थिती होती यावेळी उपस्थित मान्यवरांनी दैनंदिन आहारात पालेभाज्या कडधान्य दुग्धजन्य पदार्थ तसेच विविध फळांचा समावेश करावातसेच स्त्रियांमध्ये वाढते कर्करोगाचे प्रमाण यावर घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रगती राऊत यांनी केली तर आलिशा ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले उपस्थितांचे आभार सुरेश दुर्गे यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता प्रा. डॉ.प्रवीण वानखेडे सुरेखा राऊत शारदा कामडी आरती लोखंडे सुरज डहाके इत्यादींनी सहकार्य केले.