Home मराठवाडा मा.जिल्हाअधिकारी साहेब श्री.अरुण डोंगरे यांनी मिशन बालिका शक्ती अंतर्गत सुकन्या समृध्दी खाते...

मा.जिल्हाअधिकारी साहेब श्री.अरुण डोंगरे यांनी मिशन बालिका शक्ती अंतर्गत सुकन्या समृध्दी खाते योजनेला दिली भेट.

158

ग्राउंड रिपोर्ट सुरेश सिंगेवार M E नांदेड

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

नांदेड , दि. १७ :- रोजी होट्टल तालुका देगलूर येथे होट्टल महोत्सव व सुकन्या समृध्दी खाते योजना महोत्सव एकत्र येणे म्हणजे तिळ आणि गुळ सारखा संगम योग होय. असे डाक अधीक्षक श्री. शिवशंकर बी लिंगायत यांनी डाक सूत्र यांना सांगितले.

होट्टल महोत्सव येथे मा. डाक निरीक्षक देगलूर श्री.शिंधु नानिर यांनी डाक अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली होट्टल महोत्सवात सुकन्या समृध्दी खाते स्टोल लावण्यात आला होता.
या होट्टल महोत्सवासाठी डाक अधिक्षक यांनी नागरिकांना व या परिसरातील नागरिकांना जनजागृती करण्यासाठी वीस कर्मचाऱ्यांची डाक टीम तुकडी पाठवली होती.

भारत सरकार चे स्टोल पाहून नांदेडचे मा.जिल्ह्यअधिकारी श्री.अरुण डोंगरे साहेब यांनी मिशन बालिका शक्ती अंतर्गत सुकन्या समृध्दी खाते योजना भेट दिली.व डाक विभागाच्या विविध प्रकारच्या योजना ची माहिती व डिजिटल जाहीरात पत्रक डाक कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी साहेबांना दिली.
या महोत्सवात जवळपास सहा हजार डिजिटल जाहिरात पत्रक नागरिकांना देऊन प्रचार व प्रसार आणि जनजागृती करण्यात करण्यात आला. डाक निरीक्षक देगलूर यांनी म्हणाले की देशाची आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी डाक विभागाची सुकन्या समृध्दी खाते योजना व इंडिया पोस्ट पेमेंट बँके खाते हे सेतु सारखे काम करेल कारण सुकन्या समृध्दी खाते योजना ही एकवीस वर्षांसाठी आहे तर इंडिया पोस्ट पेमेंट बँके ही पेपर लेस बँक आहे या दोन्ही योजना भारत सरकारच्या आर्थिक विकासाला गती देणारी योजना आहेत.
असे डाक निरीक्षक देगलूर श्री.नानिर यांनी डाक विभागाच्या सूत्राला बोलताना सांगितले. डाक अधीक्षक यांनी होट्टल येथील स्टोलची पहाणी करून महोत्सवातील आलेल्या नागरिकांना डाक विभाग योजना संदर्भात जवळपास शंभरहून अधिक जनतेशी सवांद व चर्चा केली. या डाक आवेक्षक जामनूर देगलूर आणि नांदेड डाक टीम महोत्सवात मोठ्या प्रमाणात भाग घेतले होते.