श्री. सतिशजी गुप्त याच्या हस्ते हार्वेस्टरचे वितरण
(प्रतिनिधी रवि जाधव)
देऊळगाव मही:-पिप्रि आंधळे येथील शेतकरी श्री.सुखदेव गणपत डोईफोडे यांना हरवेस्टर खरेदीसाठी 17 लाख रुपये वाहन कर्ज चिखली अर्बन दे.मही शाखेच्या वतीने देण्यात आले .
मा.अध्यक्ष सतीशजी गुप्त याच्या नेतृत्वात चिखली अर्बन बँक देऊळगाव मही या शाखेने शेतकरी बांधवाना नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी प्रोत्साहन देत आली आहे .
पर राज्यातील हारवेस्टर आपल्या भागात येऊन मोठा व्यवसाय करून जातात.आपल्या
भागातील युवा शेतकरी बांधवांनी समोर येऊन ह्या व्यवसायात यावे
त्यासाठी आपल्या परिसरातील
शेतकरी बांधवांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी दि.चिखलीअर्बन बँक सदैव खंबीरपणे उभी आहे .
दि.चिखलीअर्बन बँक अतिशय कमी व्याजदरावर ,कोणतेही ब छुपे चार्जेस न लावता त्वरित कर्ज उपलब्ध करून देत आहे.
यावेळी हारवेस्टरचे विधिवत पूजन करून श्री.सुखदेव गणपत डोईफोडे यांना बँकेचे अध्यक्ष श्री.सतीशजी गुप्त ,उपाध्यक्ष श्री.पुरुषोत्तमजी दिवटे, संचालक श्री.मनोहरराव खडके यांच्या हस्ते वितरीत करण्यात आली.यावेळी खंडू मांटे ,भगवान डोईफोडे, नाना आंधळे ,अनिल कायदे ,सिद्धेश्वर डोईफोडे, रामेश्वर आंधळे ,शिवाजी आंधळे, रामदास काकड, विष्णू वाघ,संतोष नागरे ,रमेश नागरे ,
शाखाधिकारी दिनकर कुटे ,
यांची उपस्थिती होती .