‘ कर भरू पण…. कामे करा ‘
घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे
जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील व्यापारी महासंघाची नुकतीच फेरनिवड झाली असून त्या निमित्ताने येथील बाजार समितीच्या हाॅल मध्ये छोटेखानी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.त्या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय कंटुले यांनी म्हटले की, ग्रामपंचायतीच्या भुमिकेचे आम्ही मनापासून समर्थन करतो ग्रामपंचायतने व्यापाऱ्यांना कर लावला तरी आम्ही विरोध करणार नाही परंतु ग्रामपंचायतीने व्यापारी आणि गावच्या हिताची कामे करावीत अशी अपेक्षा व्यक्त केली.कार्यक्रमास पोउनि बहुरे,सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर लोया ,बाजार समिती संचालक अजीम पठाण, बाजार समिती सचिव विष्णुपंत बाहेकर सरपंचपुत्र अन्वर पठाण, उपसरपंच मनोज गाडे ,व्यापारी महासंघाचे सचिव अतुल बोकन,शफिक कुरेशी,अमीत पंडा,विजय कंटुले,दिनेश लाहोटी,हारूण शेख, चिंतामणी व्यवहारे,नयुम आतार,आयाजशेख,हामीद शेख,अक्षय चांडक,पवण राठी,शाम राऊत, पत्रकार लक्ष्मण बिलोरे,अजय गाडे आदींची उपस्थिती होती.नाजेम पठाण यांनी उपस्थितांचा सत्कार केला.