Home विदर्भ बोदडी ग्राम पंचायतीच्या सरपंच पदी उषाताई आत्राम यांची निवड‌ , “उपसरपंच पदी...

बोदडी ग्राम पंचायतीच्या सरपंच पदी उषाताई आत्राम यांची निवड‌ , “उपसरपंच पदी नर्मदा जाधव”

199

यवतमाळ  / घाटंजी – जानेवारी महिन्यात ग्राम पंचायत निवडणुकीत ग्रामविकास पॅनल ला भरभरून कौल मिळाला होता. यात दिनांक २२ फेब्रुवारी होऊ घातलेल्या सरपंच व उपसरपंच निवडीत दोनच नामांकन दाखल दाखल झाल्याने सरपंच पदी उषाताई रामराव आत्राम तर उपसरपंच पदी नर्मदा रमेश जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

बंडूभाऊ जाधव यांच्या नेतृत्वात ग्रामविकास आघाडी पॅनल ने सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आणले होते. यासाठी नरेश आयास्पुरे, वसंता उरकुडे, राजू तिजारे, संदीप गोहाडे, नंदू कामडी, मनोज आडे, विलास राठोड, रोशन जाधव, सुदर्शन आत्राम, एकनाथ टेकाम, प्रकाश मरापे, आकाश गोहाडे, पवन जाधव, पवन अलासपुरे, रोशन कामडी, आकाश उरकुडे, दिपक मते, विक्की आत्राम यांनी मोलाचे सहकार्य केले.
यात ग्राम विकास आघाडी चे पॅनल प्रमुख बंडू भाऊ जाधव यांनी नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचे स्वागत करून बोदडी वासियांचे आभार मानले. जनतेनी जो आपल्यावर विश्वास टाकला या विश्वासाला तडा जाऊ न देता गावाचा सर्वांगीन विकास करू, गावाचा विकास हेच ध्येय समोर ठेवून कार्यरत असे मनोगत नवोदित सरपंच व उपसरपंच यांनी व्यक्त केले.