( पोलीस संरक्षण मिळण्याची गृहमंत्र्या कडे मागणी )
मुंबई(प्रतिनिधी ) आंबेडकरी चळवळीतील युवा आंदोलक कार्यकर्ते आजाद समाज पार्टी चे उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष सुरेश वाघमारे यांनी आपल्या घरावर गुंड प्रवृत्ती च्या लोकांची घरावर कब्जा करण्या बद्दल मालवणी पोलीस ठाणे येथे रीतसर लेखी तक्रार केल्याने होणाऱ्या अन्याया वर आवाज उठविल्यामुळे पुन्हा चिडून खून करण्या ची धमकी मिळत असल्यामुळे मला व माझ्या कुटुंबियांना खून करण्याची धमकी मिळत असून.आंबोजवाडी आजाद नगर गेट क्रमांक 8.मालवणी मालाड पश्चिम मुंबई 95.येथील इंदूबाई रमेश काळे या अवैध दारू विक्रेत्या झोपडी दादा कडून व राजू फंगाल अजय फंगाल व राजू .व त्याची पत्नी मुळे जीव मुठीत घेऊन सुरेश वाघमारे व कुटूंबातील सदस्य आपले जीवन भेदरलेल्या अवस्थेत जगत आहेत . कोरोना काळात वाघमारे यांच्या आई ची शुगर रुग्ण असल्याकारणाने तब्बेत खराब होती तेंव्हा गावी गेले असता इंदुबाई रमेश काळे यांच्या इशाऱ्यावर राजू फंगाल अजय फंगाल व त्याची पत्नी यांनी वाघमारे यांच्या अर्ध्या घरावर कब्जा करून अनधिकृत विहीर खोदून त्याचे पाणी विकणे सुरु केले व त्यावर पत्र्या चा रूम ठोकून कब्जा जमविला आणि उर्वरित रूम ची नासधूस केली व रूमचा ताबा पाहिजेत असेल तर वाघमारे यांना इंदुबाई काळे यांनी बोलावून दीड लाख दे नाहीतर रूम बांधूदेणार नाही तुला जाग्यावर खल्लास करेन पोलीस माझ्या ताब्यात आहेत कुठे पन जा मी बघुन घेईल विभागातील इंदुबाई काळे या गुंड प्रवृत्ती च्या महिलेची दहशत बघुन नाविलाजाने पोलीस ठाणे मध्ये तक्रार केली. असून दिनांक 27/2/2021.रोजी मालवणी पोलीस ठाणे समोर धरणे आंदोलन अथवा अन्नत्याग आंदोलन करणार आहे. सुरेश वाघमारे हे आजाद समाज पार्टी चे उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष असून गणमान्य वर्तमान पत्रामध्ये मुक्त पत्रकार व समाज सेवक असून अन्याय अत्याचार प्रसंगी आंदोलन करणारा आंबेडकरी चळवळीतील युवा नेतृत्व असून जर त्याना ही वेळ येत असेल तर साधारण जनतेला किती त्रास असेल हे स्पष्ट दिसून येते .सूत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार सुरेश वाघमारे यांच्या घरावर गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पाठवून हल्ला करण्याचे संकेत मिळाले असल्यामुळे सुरेश वाघमारे यांनी पोलीस संरक्षण मिळण्याची मागणी गृह मंत्र्याकडे मेल द्वारे केली असून वाघमारे यांना विविध राजकीय सामाजिक संघटनेचे पाठबळ मिळत असून विविध संघटना वाघमारे यांना न्याय मिळण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहेत असे समजते