Home विदर्भ सुधिर उर्फ बाळा राऊत यांची राष्ट्रवादी काँग्रेस विदर्भ सम्पर्क प्रमुख म्हणून नियुक्ती

सुधिर उर्फ बाळा राऊत यांची राष्ट्रवादी काँग्रेस विदर्भ सम्पर्क प्रमुख म्हणून नियुक्ती

167

विनोद पञे 

यवतमाळ , दि. २७ :-  महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वक्ता प्रशिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य ह्यांचे वतीने आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब व मा. ना. जयंतराव पाटील साहेब ह्यांना अभिप्रेत असणारी संघटना बांधण्यासाठी व बळकटी व मजबुती करण्यासाठी श्री. सुधीर उर्फ बाळा मनोहरराव राऊत (पाटील) रा. वडगाव (पो. स्टे.) ता. जि. यवतमाळ (ह. मु. यवतमाळ) ह्यांची विदर्भ सम्पर्क प्रमुख या पदावर दि. 25/2/2021 रोजी नियुक्ती करण्यात आली आहे.
सुधिर उर्फ बाळा राऊत ह्याच्या निवडीबाबत जिल्ह्यातून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. जयहिंद क्रीडा मंडळ, यवतमाळ, नव जयहिंद क्रिडा मंडळ, यवतमाळ, नवयुवक क्रीडा मंडळ वडगाव (पो. स्टे.), तसेच जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यवतमाळ जिल्हा आणि विदर्भातील सर्व राष्ट्रवादी जिल्हा काँग्रेस कमिटी, जिल्हा अध्यक्ष, सर्व जिल्ह्यातील राष्ट्रवादी चे पदाधिकारी, जेष्ठ मंडळी आणि वडीलधारी मंडळी यांचे आशीर्वाद व शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.