Home जळगाव एस आई ओ रावेर शाखा तर्फे मा तहसीलदार यांना निवेदन

एस आई ओ रावेर शाखा तर्फे मा तहसीलदार यांना निवेदन

223

रावेर (शरीफ शेख)

महाराष्ट्र शासन तर्फे आरोग्य विभागातील विविध पदासाठी घेतलेली लेखी परीक्षात झालेले गोंधळाची तपासणी करून ल परीक्षा रद्द करण्याच्या निवेदन एस आई ओ रावेर शाखा तर्फे मा तहसीलदार रावेर यांना सोपविण्यात आला. सविस्तर बातमी अशी की दिनांक 28 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र आरोग्य विभागातील विविध पदासाठी झालेल्या लेखी परीक्षेत मोठा गोंधळ झाला होता काही परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिकेचे सील वेळेच्या अगोदर तुटलेले होते. आणि काही ठिकाणी विद्यार्थ्यांची बसण्याची सोय नव्हती अनेक परीक्षा केंद्रावर एका बाकावर एकापेक्षा जास्त परीक्षार्थी बसले होते तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण ही करण्यात आला होता. इतकेच नव्हे तर काही परीक्षार्थींना मोबाईलवर उत्तरे पाठविण्यात आले व परीक्षार्थींनी मोबाइलच्या माध्यामाद्वारे उत्तरे लिहली. ह्या सर्व बाबीवर गांभीर्याने विचार करून शासनाने ही परीक्षा रद्द करून पुन्हा व्यवस्थित रित्या परीक्षा घ्यावी अशी मागणी आम्ही स्टुडेंट इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया उत्तर महाराष्ट्र विभागातर्फे करण्यात येत आहे.
असे निवेदन मा तहसीलदार रावेर यांचेमार्फत मा मुख्यमंत्री , मा शिक्षण मंत्री, मा आरोग्य मंत्री, व इतर राजकीय पदाधिकाऱ्यांना देण्यात आले.