Home विदर्भ देवळी तालुक्यातुन वाहनारी, वर्धा नदीतून जे. सी. बी च्या सहाय्याने वाळू उपसा...

देवळी तालुक्यातुन वाहनारी, वर्धा नदीतून जे. सी. बी च्या सहाय्याने वाळू उपसा जोमात.

250

अधिकारी देते वाळू माफियांना तक्रारकर्त्याचि माहिती.

ईकबाल शेख

वर्धा जिल्हा देवळी तालुक्यात काहि भागातून रात्रंदिवस वर्धा नदी पात्रातून वाळूचा अनधिकृत व अवैध उपसा जे.सी.बी.च्या साह्याने जोमात सुरू आहे. खनीज व गौण खाते मात्र चक्क कोमात गेले आहे. तालुक्यात वाळूतस्करांनी धुमाकूळ घातला असून जिल्हाधिकारी वर्धा मात्र तालुक्याकडे चक्क डोळेझाक करीत असल्याची चर्चा सर्वत्र ऐकावयास मिळत आहे .

मागिल काहि महिन्यापासुन वाळू तस्करांनी अधिका-यांना हाताशी धरून हैदोस घातला आहे. या व्यवसायात होणारा प्रचंड फायदा पाहून अनेकांनी वाळू उपसा करून आपली तुंबडी भरून घेतली आहे. लाखो रुपयांची कमाई करून घेतली .

सध्या वर्धा नदीत पाणी वाहत आहे. यात देवळी तालुक्यातील भागांत वाळू तस्करांनी धुमाकूळ घातला असून अधिकारी, कर्मचारी ,तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या समोरून टिप्पर ,हायवा ,ट्रक, ट्रॅक्टर वाळूने भरून जात आहेत पण अधिका-यांकडून डोळेझाक केली जात आहे. या गावाच्या भागातील तलाठी ,मंडळ अधिकारी व गौण खनीज विभागाचे अधिकारी व तहसीलदार यांची तोंडे आर्थिक व्यवहारातून बंद केल्याची चर्चा ऐकावयास मिळते आहे. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.

या तालुक्यातून घाटा लागत असलेल्या गावातुन हायवा, टीप्पर, ट्रक, व ट्रॅक्टर अनाधिकृतपणे वाळू वाहून नेण्याचे काम रात्रंदिवस व राजरोसपणे करीत आहेत. त्यामुळे तालुक्यातील सर्व रस्त्यांची चाळणी झाली आहे. तालुक्यातील गावांचे रस्ते हायवा, टिप्पर, ट्रकच्या ओझ्याने उखडून गेले आहेत. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हे ओळखणे आता कठीण झाले आहे. यामुळे इतर प्रवास करणा-यांचे वाहन खराब होऊन कमरेचे ,मणक्याचे ,मानेचे, हाडाचे आजार होत आहेत. वाळूतस्करांची कोट्यवधींची उलाढाल होत आहे.जे हायवा टिप्परवाले अधिका-यांना सांभाळत नाहीत अशांचे महिन्यातून एखादेवेळी टिप्पर पकडले जाते.