Home विदर्भ वाढत्या महागाई विरोधात घाटंजीत विश्वरूप फाउंडेशन चे निवेदन

वाढत्या महागाई विरोधात घाटंजीत विश्वरूप फाउंडेशन चे निवेदन

188

यवतमाळ / घाटंजी – दिवसेनदिवस प्रत्येक बाबीवर वाढती महागाई त्यामध्ये कोरोना महामारीसोबत. संघर्ष कामधंदा नसणे याला सर्वसामान्य जनता मेटकुतीस आली असून या महागाईवर लगाम लावावा यासाठी दिनांक ०८-०३-२०२१ रोजी तहसील कार्यालय घाटंजी येथे महागाई विरूध्द विश्वरूप फाऊंडेशन,घाटंजी च्या वतीने निवेदन देण्यात आले,यासह आजमितीस वाढलेली महागाई व २ वर्षा पूर्वी असलेली महागाई याचा तुलनात्मक तक्ता दर्शवून जी महागाई प्रशासनाने आटोक्यात आणून गरीब व सामान्य जनतेला न्याय मिळवून द्यावा,जेणे करून सामान्य लोकांचे जीवनमान जगणे सुलभ होईल.अशी मागणी केली, निवेदन देतेवेळी संतोष ओंकार,अध्यक्ष विश्वरूप फाऊंडेशन, घाटंजी सुनील नगराळे कार्याध्यक्ष,विश्वरूप फाऊंडेशन, घाटंजी शुभम नगराळे,उपाध्यक्ष विश्वरूप फाऊंडेशन, घाटंजी,जितेंद्र मूनेश्र्वर,सचिव विश्वरूप फाऊंडेशन, घाटंजी महेंद्र देवतळे,सचिव तालुका पत्रकार संघ,घाटंजी,अजय गजभिये, बी. टी. वाढवे,प्रतीक पाटील,उमेश घरडे, दुधनाथ गजभिये, संजय घुसे, गणेश लोहकरे, यासह बहूसंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.