१२मार्चपासून पुढील आदेशपर्यंत जनता कर्फ्यु
प्रतिनिधी – महागाव
यवतमाळ – महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथे मागील काही दिवासापासून कोरोना रुग्णाची संख्या वाढत असल्याने मा.जिल्हाधिकारी साहेब यांनी हिवरा येथील वॉर्ड क्रमांक 2 प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित केले असून त्याचे आदेश काढण्यात आले आहे.
तालुक्यातील हिवरा संगम येथील वॉर्ड क्रमांक 2 मध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला असल्याने कोरोना विषाणूचा संसर्ग पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व प्रतिबंधात्मक उपयोजना म्हणून वॉर्ड क्रमांक 2 च्या सर्व सीमा बंद करण्यात आले असून पॉझिटिव्ह रुग्णाच्या घरी व परिसरात सॅनिटायझरची फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. हिवरा संगम येथे वाढत्या कोरोना विषाणू संसर्ग पसरू नये म्हणून हिवरा येथे दिनांक १२ मार्च पासून ते १४ मार्च पर्यंतचा तीन दिवसीय जनता कर्फ्यु लावण्यात आला असून परस्थिती लक्षात घेता अजून ही जनता कर्फ्युचा कालावधी मध्ये वाढ होऊ शकते असे अप्पती व्यवस्थापन समितीच्या पदाधिकारी यांनी सांगितले आहे.
हिवरा संगम गावात कोरोनाने शिरकाव केले असून गावातील काही भाग प्रतिबंधात्मक केला असून हिवरा गावातील आतापर्यंत ९१ नागरिकांच्या तपासण्या केल्या असून त्यामधील १६ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह असून नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच उपाययोजना म्हणून हिवरा गावातील सर्व व्यापारी, दुकानदार, दुकानातील कर्मचारी,खाजगी डॉक्टर यांची कोरोना चाचणी करणे अनिवार्य असून कोरोना चाचणी केल्यानंतरच दुकाने बंद ठेवायचे की चालू ठेवायचे हा निर्णय घेणार असल्याचे समितीने सांगितले आहे.तर यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जब्बार पठाण,लोकप्रतिनिधी म्हणून जि.प. सदस्य विलासराव भुसारे,डॉ दानव गावंडे, डॉ नागपुरे, वाल्मिक टाकरस,श्रीमती जांभुळकर मॅडम,आशासेविका सौ दर्शना कांबळे,सौ अनिता वानखेडे,शोभा बोडारे,सरपंच सौ मेघा बोरूळकर, उपसरपंच शरद पाटील,राजू धोतरकर,विजयराव बोंपिलवार,पोलीस पाटील प्रवीण कदम,तलाठी शेख, पोलीस जमादार रुपेश चव्हाण,प्रभारी ग्रामसेवक देशमुख,कोतवाल जीवन जाधव,कर्मचारी सुधीर कदम, स्वप्नील बेलखेडे,विशाल कदमसह अप्पती व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.
हिवरा गावात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून नागरिकानी मास्क सॅनिटायझरचा वापर करावा तसेच शासन प्रशासनाने दिलेल्या सूचनेचे पालन करून लक्षणे असल्यास त्वरित कोरोना चाचणी करून घ्यावी:- डॉ जब्बार पठाण(तालुका आरोग्य अधिकारी) गावामध्ये कुठलाही भेदभाव न करता आम्ही आप्पती व्यवस्थापन समिती मार्फ़त नियम मोडल्यास कारवाई करत आहो, नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन समितीला सहकार्य करावे:- शरद पाटील आपत्ती व्यवस्थापन समिती सदस्य तथा उपसरपंच