जालना – अंबड शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शोध संस्थान कार्यालयात दि.16 मार्च रोजी दु.1 वा मराठा साम्राज्याचे सेनापती माळवा राज्य संस्थापक सुभेदार मल्हारराव होळकर यांची 328 वी जयंती साजरी करण्यात आली.
चिचंखेडचे सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब पैठणे यांनी सुभेदार मल्हाररावांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन केले यावेळी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष पा.जिगे, जालना नगरीचे संपादक गिताराम मते,पत्रकार अनिल भालेकर, तुकाराम खंडागळे सह अथर काजी,योगेश शिगांडे उपस्थित होते.होळकर रियासतीचे अभ्यासक रामभाऊ लांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले यावेळी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करण्यात आले.कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सुभेदार मल्हारराव होळकर जयंतीसोहळा मोठ्या प्रमाणावर साजरा न करता मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.