Home जळगाव वसिम रिजवी वर गुन्हा दाखल करा कौमी एकता फाउंडेशन व मुस्लिम पंच...

वसिम रिजवी वर गुन्हा दाखल करा कौमी एकता फाउंडेशन व मुस्लिम पंच कमेटी चिनावल यांची मागणी

228

रावेर (शरीफ शेख)

कौमी एकता फाउंडेशन व मुस्लिम पंच कमेटी चिनावल तर्फे सावदा पोलीस स्टेशन चे सहायक पोलीस निरीक्षक देविदास इंगोले साहेब यांना निवेदन देण्यात आला दिलेल्या निवेदनात म्हटले की दि.11/03/2021 रोजी लखनऊ उत्तर प्रदेश येथील राहणारे शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिजवी यांनी सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल करून जगभरातील सर्वात पवित्र धर्मग्रंथ कुराण शरीफ मध्ये बदल करून त्याच्यात असलेले 26 आयात (sentence) वगळण्यात यावी अशी मागणी केली. त्याच्या या याचिकेला सुप्रीम कोर्ट अँडमिट न करता फेटाळून लावतील यात शंका नाही. मात्र एका पत्रकाराशी बोलतांना सांगितले की कुरान हे आतंकवादची शिकवण देतो‌ व इस्लाम धर्मातील सुरुवातीचे तीन खलिफा यांनी ताकतीचा प्रयोग करून इस्लामचा फैलाव केला असे दूष प्रचार करून इस्लाम धर्माची छवी मलीन करण्याचे काम त्यांनी केले आहे.असा षड्यंत्र रचून त्यांनी आमच्या धार्मिक भावना दुखावल्या बद्दल आम्ही वसीम रिजवी याच्याविरुद्ध कायदेशीर तक्रार दाखल करीत आहे. तरी वसीम रिजवी विरुद्ध भा.द.वि.ची कलम 295, 295A, 296, 298, या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदन द्वारे करण्यात आली आहे.

निवेदन देताना इरफान मेंबर, निसार खान, जाबीर शेख, मुस्तकिम शेख, नज़ीर शेख आदी उपस्थित होते.