Home जळगाव वसीम रिजवी ला अटक करा व कारवाई करण्या ची मांगणी

वसीम रिजवी ला अटक करा व कारवाई करण्या ची मांगणी

709

रावेर (शरीफ शेख)

जळगाव जिल्ह्यातील कासोदा तालुका एरंडोल
येथील मौलाना आझाद विचार मंच च्या वतीने वसीम रिजवी ला अटक करा व कारवाई करा अशी मागणी करण्यात आली . 
इस्लाम मेसेज ऑफ पीस इस्लाम शांतीच्या संदेश देणार आहे कुरआन शरीफ च्या तत्वावर चालणारा हा धर्म आहे कुरान शरीफ शांती सद् भावना चा प्रतीक असून वासना तसेच संसारात सर्व वाईट गोष्टला विरोध करणारा धर्म आहे अशा कुरान शरीफ मधील 26 सुर् हे काढण्याची माँग उत्तर प्रदेश येथील लखनऊ शहर चे शिया वक्फ बोर्ड माजी अध्यक्ष वसीम रिजवी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे कुरान मधला कोणताही शब्द बदलता येत नाही यापूर्वीही त्याने असे अनेक किस्से केले आहे त्याच्या फक्त हिंदू मुस्लिम यांच्यात वाद निर्माण करणे व कायम प्रसिद्धी मध्ये राहणे हेच आहे या कारणाने सर्व शिया समाजाने त्याच्या तीव्र विरोध केला आहे त्याच्या भाऊ-बहीण आई व पत्नी यांनी पण त्यांच्याशी नाते तोडले आहे तरी अशा समाज कंटक ला अटक करा व कारवाई करा अशी मागणी मौलाना आझाद विचार मंचतर्फे कासोदा पोलीस स्टेशनला एपीआय रवींद्र जाधव साहेब यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे
यावेळेस नूरुद्दीन मुल्लाजी, आरिफ पेंटर ,सलाउद्दीन अल्लाउद्दीन शेख ,हमजे खान, रजा केबल चे मुश्ताक भाई, जाकीर खान ,मुश्ताक शायर, मुजाहिद खान, मंसूर खान, गालीब मिर्झा अर्तजा मुल्लाजी, शेख जहूर उपस्थित होते.