अमीन शाह ,
– मुलगी दिली नाही म्हणून मुलीच्या आईला पळवून नेण्याचा प्रकार आपण चित्रपटातत अनेकवेळा पाहिला असेल . मात्र , अशी घटना धुळे जिल्ह्यात खरोखर घडली आहे . मुलगी दिली नाही म्हणून चक्क मुलीच्या आईलाच पळवल्याचा अजब प्रकार धुळ्यात घडलाय . मुलगी देण्यास नकार दिल्यामुळे तरुणाने चक्क मुलीच्या आईलाच फुस लावून पळवलंय . विशेष म्हणजे , तरुणासोबत पळून गेलेल्या मुलीच्या आईने ” मी आता तुमच्याकडे येणार नाही . आम्ही लग्न करत आहोत , ” असं आपल्या पतीला फोनवरुन सांगितलंय
.. मिळालेल्या माहितीनुसार , काही दिवसांपूर्वी धुळ्यातील एक तरुण लग्नासाठी मुलगी बघण्यासाठी गेला . यावेळी मुलीच्या आईवडिलांनी या तरुणाला मुलगी देण्यास नकार दिला . हा नकार न पचल्यामुळे या तरुणाने चाकूचा धाक दाखवत मुलीच्या आईलाच पळून नेईल अशी चक्क धमकी दिली . तरुणाची ही अजब पद्धत मुलीच्या घरच्यांना आवडली नाही . तरुणाचा हा आक्रस्ताळेपणा पाहून मुलीच्या घरच्यांनी लग्नास थेट नकार दिला .
मुलीच्या आईसोबत फोनवर गप्पा ……
या तरुणाने मुलीच्या आईशी फोनवर बोलणं सुरु केलं . नंतर दोघांमध्ये जवळीक वाढल्यानंतर एके दिवशी मुलीची आई घरातून गायब झाली . पळून गेलेल्या महिलेचा पती अचानक कामावरून घरी आल्यानंतर घरात आपली पत्नी दिसत नसल्याने थोटा घाबरला . आपल्या पत्नीची शोधाशोध करूनही ती सापडत नसल्याने तो हैराण झाला . शेवटी त्याने आपल्या पत्नीशी फोनवरुन संपर्क केल्यानंतर मुलगी न दिलेल्या तरुणानेच आपल्या बायकोला पळवल्याचे त्याच्या लक्षात आले . ही माहिती पळून गेलेल्या बायकोने स्वत : त तिच्या पतीला सांगितली
यावेळी पळून गेलेल्या महिलेने परत येण्यास चक्क नकार दिल्याचे समजते . ” मी आता तुमच्याकडे येणार नाही , ” असे या महिलेने आपल्या पतीला फोनवर सांगितले आहे . एवढंच नाही , तर आम्ही लग्न करत आहोत , असेदेखील या महिलेने 25 वर्षे सोबत राहिलेल्या आपल्या पतीला फोनवरुन सांगितले . पळून गेलेल्या महिलेला 5 आपत्य , 4 नातवंड …… जिच्याशी आपण पंचवीस वर्षे संसार केला . जिला आपलं सर्वस्व मानलं ; अशा 41 वर्षीय पत्नीने अर्ध्यातच मार्ग बदलल्यामुळे महिलेचा पतीच चांगलाच हादरला आहे . न होणाऱ्या जावया सोबतच आपली पत्नी संसार थाटणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त झाल्याची भावना महिलेच्या नवऱ्यामध्ये आहे . पळून गेलेल्या महिलेला 5 मुलमुली तसेच चार नातवंड आहेत . दरम्यान , जिच्यासोबत आयुष्याची 25 वर्षे घातली तीच हात सोडून पळून गेल्यामुळे पुढे काय ? असा प्रश्न पळून गेलेल्या महिलेच्या पतीसमोर उभा ठाकला आहे .