Home नांदेड डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात खाटाच्या माहितीसाठी कोविड-19 चौकशी कक्ष सुरु

डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात खाटाच्या माहितीसाठी कोविड-19 चौकशी कक्ष सुरु

597

संतोष भद्रे

नांदेड‌  – डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड येथील बाह्यरुग्ण विभागात “कोविड-19 चौकशी कक्ष” 24 तासासाठी सुरु करण्यात आला आहे. या कक्षात वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता 24 तास उपलब्ध राहणार असून येथील दूरध्वनी क्रमांक 02462-229221 असा आहे. रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी खाटा उपलब्ध आहेत किंवा नाही याची माहिती येथे उपलब्ध करुन दिली जाईल.
 
जिल्ह्यासह, शहरातील तसेच इतर ठिकाणाहून किंवा रुग्णालयातून संदर्भीत होणाऱ्या रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी 02462-229221 या दूरध्वनीवर क्रमांकावर संपर्क करुन खाटा उपलब्ध असल्यास रुग्णाला येथे संदर्भीत करावे. रुग्ण संदर्भीत करतांना रुग्णाचे आधार कार्ड व रेशनकार्ड सोबत आणण्यास संदर्भीत करणाऱ्या रुग्णालयाने सांगावे जेणेकरुन रुग्णाला महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत लाभ देता येईल. कोरोनामुळे मृत्त पावलेल्या व्यक्तीच्या देहाच्या अंत्यसंस्कार संदर्भातील माहितीसाठी डॉ. अक्षय गव्हाणे यांचा भ्रमणध्वी क्रमांक 9527895183 येथे संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील जनऔषधवैकशास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभाग प्रमुख यांनी केले आहे.