Home विदर्भ यवतमाळ जिल्ह्यात 15 मृत्युसह 338 जण पॉझेटिव्ह तर  440 जण कोरोनामुक्त

यवतमाळ जिल्ह्यात 15 मृत्युसह 338 जण पॉझेटिव्ह तर  440 जण कोरोनामुक्त

449

यवतमाळ, दि. 29 : गत 24 तासात जिल्ह्यात 15 मृत्युसह 338 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 440 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 75 वर्षीय पुरुष आणि 66, 85, 47, 58, 67 वर्षीय महिला, दारव्हा येथील 55 वर्षीय महिला, केळापुर तालुक्यातील 65 वर्षीय महिला आणि 55 वर्षीय पुरुष, कलंब तालुक्यातील 26 आणि 70 वर्षीय पुरुष, आर्णी तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष, घाटंजी येथील 65 वर्षीय पुरुष, उमरखेड येथील 45 वर्षीय पुरुष आणि नांदेड येथील 33 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
सोमवारीवारी एकूण 3035 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 338 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 2697 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2487 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 27889 झाली आहे. 24 तासात 440 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 24770 आहे. तर जिल्ह्यात एकूण 632 मृत्युची नोंद आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 264541 नमुने पाठविले असून यापैकी 255969 प्राप्त तर 8572 अप्राप्त आहेत. तसेच 228080 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.