Home पश्चिम महाराष्ट्र नांदेड येथे पोलिसांवर झालेल्या हल्ल्याच्या चौकशीबाबत पोलीस मित्र परिवार समन्वय समिती चे...

नांदेड येथे पोलिसांवर झालेल्या हल्ल्याच्या चौकशीबाबत पोलीस मित्र परिवार समन्वय समिती चे गृह मंत्रालयाकडे निवेदन

389

नांदेड येथे पोलिसांवर केलेल्या हल्ल्याच्या संबंधित व संशयितांवर कारवाई करावी व पोलिस विभागावर होणार्‍या हल्ल्यांना वेळी आळा घालावा याबाबत पोलिस मित्र परिवार समन्वय समितीकडून हाजी असलम व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गृहमंत्रालयाकडे नीवेदन देण्यात आले.

भारत देशात कायदा व सुव्यवस्था राखताना सर्व राज्यातील पोलिस यंत्रणेने भारत देशाची मान सदैव उंचावली आहे. भारतात सण-उत्सव संस्कृती आणि परंपरा जपताना कायदा व सुव्यवस्था राखणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे परंतु कोणाची सद्यस्थिती पाहता सरकारने समाज तसेच प्रत्येकाच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने काही नियमावली तयार केली आहे.

त्याचे पालन करणे सर्वांना बंधनकारक आहे याचाच एक भाग म्हणून पोलीस यंत्रणेचे अधिकारी कर्मचारी हे कायदा व सुव्यवस्था राहावे व नियमांचे पालन केले जावे यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र पोलिसांच्या या कायदा व सु व्यवस्थेलाच आवाहन देत नांदेड येथे सोमवारी 29 मार्चला अज्ञात लोकांनी हल्ला केला तो अयोग्य व निषेधार्थ आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर तसेच कायदा हातात घेणार यावर काटेकोर कारवाई करावी नम्र विनंती पोलीस मित्र परिवार समन्वय समिती यांच्याकडून करण्यात आली.