Home विदर्भ सावळी (सदोबा) येथील किशोर केशेट्टीवार विरुद्ध पारवा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल..!

सावळी (सदोबा) येथील किशोर केशेट्टीवार विरुद्ध पारवा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल..!

1832

आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता..?

अयनुद्दीन सोलंकी,

घाटंजी (यवतमाळ) – पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सावळी (सदोबा) येथील संशयीत आरोपी किशोर दादाजी केशेट्टीवार यांनी जागृती अँग्रो फुड्स प्रोजेक्ट्स या शेळी पालनाच्या व्यवसायात पैसे गुंतवून भाजपाचे आर्णी तालुका उपाध्यक्ष फिर्यादी प्रशांत मारोतराव खरात यांची फसवणुक केल्या प्रकरणी संशयीत आरोपी किशोर केशेट्टीवार विरुद्ध भादंवि 420, 506 फसवणूक, धमकी दिल्याचा गुन्हा पारवा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरख चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक देविदास टेंभरे पुढील तपास करीत आहे. या प्रकरणामुळे सावळी (सदोबा) परिसरात खळबळ माजली असून अनेक गर्भश्रीमंत, धनाड्य ईसम व अमर नामक व्यक्ती सह ईतर लोक आरोपी होण्याची दाट शक्यता आहे.
पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, संशयीत आरोपी किशोर केशेट्टीवार याने सन 2014 मध्ये फिर्यादी प्रशांत खरात याची भेट घेऊन जागृती अँग्रो फुड्स प्रोजेक्ट्स मध्ये शेतीपालनात व्यवसायात काही रक्कम गुंतवली तर अनेक फायदे होउ शकतात, असे सांगीतले. तसेच किमान 5000 रुपये व कमाल कितीही रक्कम गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ होईल असे सांगून कंपनी मध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहीत केले. त्यावर विश्वास ठेवून फिर्यादी प्रशांत खरात यांनी आरोपी केशेट्टीवार यास सन 2014 मध्ये रुपये 5000 देउन गुंतवणूक केली. तसेच आरोपीने 27 आँक्टोंबर 2014 ते 27 आँगस्ट 2020 या कालावधीत बाँन्ड सुद्धा फिर्यादीस आणून दिला. विशेष म्हणजे बाँन्ड ची मुदत संपल्यावर फिर्यादी प्रशांत खरात याने केशेट्टीवार यांना बाँन्ड ची मुदत संपल्याने रक्कमेची मागणी केली. मात्र, आरोपीने रक्कम देण्यास टाळाटाळ करुन कंपनी सोबत पत्रव्यवहार करण्यास सांगितले. त्यावरुन प्रशांत खरात यांनी कंपनीकडे पोष्टाने पत्र व्यवहार केला असता, तेथे कोणतेही कार्यालयच उपलब्ध नसल्याने पाठविलेले कागदपत्रे परत आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्याने 16 जानेवारी रोजी आरोपी यांस विचारणा केली असता, आरोपीने फिर्यादीस जिवे मारण्याची धमकी दिली, अशा रिपोर्ट वरुन पारवा पोलीसांनी संशयीत आरोपी किशोर केशेट्टीवार विरुद्ध जिवे मारण्याची धमकी देउन, फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, तपास अधिकारी देविदास टेंभरे यांचेशी संपर्क केला असता, आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असे त्यांनी बोलतांना सांगितले. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक देविदास टेंभरे करित आहे.