पालिकेमध्ये मो.युसूफ पुंजानी गटाचा वरचष्मा
प्रतिनिधी – कारंजा (लाड)
वाशिम , दि. १८ :- कारंजा नगर पालिकेच्या सभापती व स्थायी समितीच्या निवडणुकीमध्ये मो.युसूफसेठ पुंजानी गटाचा वरचष्मा राहिला. या निवडणुकीचे पिठासिन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी अनुप खांडे यांनी कामकाज पाहिले. त्यांना मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी सहकार्य केले.
विशेष समित्यांमध्ये नियोजन व विकास समिती सभापती पदी अॅड.फिरोज छट्टू शेकूवाले, शिक्षण समिती सभापती पदी शाहीन परवीन ईकबाल हुसैन,आरोग्य व वैद्यकीय रक्षण समिती सभापतीपदी सलीम शेख लालू गारवे,सार्वजनिक बांधकाम सभापती पदी मालन भोजा प्यारेवाले,महिला व बालकल्याण सभापती पदी सौ.वर्षा राजू इंगोले, महिला बालकल्याण उपसभापती पदी रुबीना परवीन इरफान खान तसेच स्थायी समिती मध्ये निसार खान नजीर खान , ईरशाद अली रियासत अली, प्रसन्ना पडसकर यांना घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे कारंजा पालिकेच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत सर्व सभापती तसेच दोन स्थायी समितीचे सदस्य हे युसूफ पुंजानी गटाचे झाले.तर केवळ आघाडीचे स्थायी समितीमध्ये एक सदस्य निवडून आले. सभापती पदाच्या निवडणुकीनंतर मो.युसूफ पुंजानी तसेच नगराध्यक्ष शेषराव ढोके यांनी नवनिर्वाचित सभापतींचा सत्कार केला.