अमरावती – अमरावती ग्रामीण कार्यक्षेत्रामध्ये काही दिवसांपासुन घरफोडी व चोरी यासारखे मालमत्तेच्या गुन्हयांमध्ये अलीकडे अचानकपणे वाढ झाली होती .
त्याअनुषंगाने मा . श्री . डॉ . हरि बालाजी एन . पोलीस अधीक्षक , अमरावती ग्रामीण यांनी घडलेल्या गुन्हे व त्यामध्यील गुन्हेगाराची गुन्हे करण्याची कार्यपध्दती गुन्हे करण्याचे ठिकाण यांचा सर्व समावेशक आढावा घेवून गुन्हे उघडकीस आणण्याकरीता पो.नि. तपन कोल्हे स्था.गु.शा. अमरावती ग्रामीण यांना मार्गदर्शक सुचना दिल्या होत्या . त्याअनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक विजय गराड , ए.एस.आय. मुलचंद भांबुरकर , पो.हे.कॉ. सुनिल केवतकर , ना.पो.कॉ. संतोष तेलंग , ना.पो. कॉ . बळवंत दाभणे ना.पो.कॉ. मंगेश लकडे , ना.पो.कॉ. चंद्रशेखर खंडारे स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण यांचे पथक नेमुन आरोपीचा शोध घेण्याबाबत आदेशीत केले होते .
यादरम्यान दिनांक २५/०३/२०२१ रोजी फिर्यादी मनिष भगतसिंग धुर्वे वय १८ वर्ष , रा . शांताबाई शिंदे यांचे कु – हा ते अमरावती रोडवरील शेतात यांनी दिलेल्या तक्रारीवरून पो.स्टे . कु – हा अपराध क्रमांक ६३/२०२१ कलम ३८० भादवीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता .
सदर गुन्हयांचा आज दिनांक ०५/०४/२०२१ रोजी आम्ही पो.उप.नि. विजय गराड , स्था.गु.शा. अमरावती ग्रामीण सोबत ए.एस.आय. मुलचंद भांबुरकर ब.नं .१० ९ ४ , पो.हेकॉ . सुनिल केवतकर ब.नं .१४ ९ २ , ना.पो.कॉ. संतोष तेलंग ब.नं .५ ९ ५ , ना.पो.कॉ. बळवंत दाभणे ब.नं. ४७७ , ना.पो.कॉ. मंगेश लकडे ब.नं. १८०४ , ना.पो.कॉ. चंद्रशेखर खंडारे ब.नं. १८१७ असे सरजीप कमांक एम एच २७ एए ५६० चालक ना.पो.कॉ. नितेश तेलगोटे ब.नं .१८७४ यांचेसह पो.स्टे . कु – हा हद्दीत प्रो.व्हि . जुगार रेड व आरोपी शोध करीता तसेच सदर गुन्हयाचा समातंर तपास पेट्रोलींग करीत असतांना गुप्तबातमीदाराकडून खबर मिळाली की , सदरचा गुन्हा हा विनोद लक्ष्मणराव बोंभल रा . येरला ता . मोर्शी यांचे शेतातील सोकारीवर काम करणारे लोकांनी केलेला असुन ते विनोद बोबल याचे शेतातील टिनाचे / तटटयांचे झोपडीत राहत आहेत . अशा माहितीवरून आम्ही , पंच व सोबत असलेल्या पोलीस स्टॉपसह गुप्तखबरेप्रमाणे ग्राम येरला शेतशिवारातील विनोद लक्ष्मण बोंबल यांचे सर्वे नं . ८६ ( १ ) या शेतात असलेल्या टिनाच्या झोपडीसमोर जावून आवाज देवून झोपडीतील लोकांना बाहेर बोलावून त्यांचे पंचासमक्ष नाव गाव विचारले असता त्यांनी आपले नाव १ ) अशोक मोहन युवनाते वय २८ वर्ष , मुळ रा . पांढरघाटी ता . वरूड जि . अमरावती २ ) रवी रेवांसा युवनाते वय २४ वर्ष , मुळ रा . मैनीखापा ता . पांढूर्णा जि . छिंदवाडा राज्य मध्यप्रदेश असे सांगीतले . वरून त्यांना विश्वासात घेवून वर नमुद कु – हा येथील गुन्हयाबाबत विचारपूस केली असता त्यांनी गुन्हयांची कबुली देवून गुन्हयातील मुद्देमाल हा त्यांचे शेतातील झोपडीत लपून ठेवले असल्याची माहिती दिली . वरून आम्ही नमुद आरोपीस ताब्यात घेवून पंचासमक्ष आरोपींचे राहत्या झोपडीतील झडती घेतली असता गुन्हयातील चोरी गेलेला मुद्देमाल तसेच गुन्हा करण्याकरीता वापरण्यात आलेली मोटार सायकल मिळून आली . तो पुढीलप्रमाणे मुद्देमाल ताब्यात घेतला .
आरोपीतांकडून जप्त मुद्देमाल १ ) एक जूना वापरता आय.ई.एम.आय. कंपनीचा २४ इंची एल.ई.डी. टि.व्हि . जुना वापरता व रिमोट कंट्रोल एक कि.अं .१०,००० रू २ ) होमथेटर मिलटॉन ४३४३ कंपनीचा ४.१ जुना वापरता व रिमोर्ट कंट्रोल एक कि.अं. २००० रू ३ ) एक वेस्टॉन कंपनीचा सेट टॉप बॉक्स केबलसह जूना वापरता कि अं . २००० रू ४ ) एक रिअल मी सी . २ कंपनीचा काळया रंगाचा अॅण्डरॉईड मोबाईल चार्जरचासह जुना वापरता ज्याचा IMEI कमांक ८६०४३१०४४१५५२ ९ ५ , ८६०४३१०४४१५५२८७ असा असुन त्यामध्ये जिओ कंपनीचो सिमकार्ड क . ८ ९९ १८६३०४००२८१८५२६५४ असा आहे . कि.अं. ४००० रू ५ ) गॅस शेगडीच्या कडया २ लोखंडी व पितळी बर्नर नग २ , एक फायबर पाटी असलेली पावशी , अनाजाच्या भरण्या ६ , एक पकड सांडशी , एक खल असा एकूण कि.अं. ५००० रू ६ ) एक बजाज डिसकव्हर कंपनीची १०० सी.सी. काळया रंगाची मो.सा. क . सदयाचा एम . पी . ४८ एम.ए. ६४८३ ज्याचा चेचीस कमांक MD2A57AZ7EWK14929 इंजीन क . PAZWEK90138 कि.अं. ४८००० रू ७ ) एक LLOYD कंपनीचा ३२ उंची LED TX कि.अं .१८००० रू असा एकूण ८ ९ ००० रू चा मुद्देमाल आरोपींचे ताब्यातुन पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे .
तसेच पो.स्टे. बेनोडा येथील 2 व मोर्शी येथील 1 असे एकुण 4 चोरीचे गुन्हे उघडकीस आणले.
सदरची कार्यवाही मा . पोलीस अधीक्षक श्री . हरी बालाजी एन . , अपर पोलीस अधिक्षक श्री . श्याम घुगे यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. तपन कोल्हे , स्था.गु.शा. अमरावती ग्रामीण यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पो.उप.नि. विजय गराड , ए.एस.आय. मुलचंद भांबुरकर , पो.हवा . सुनिल केवतकर , नापोकॉ संतोष तेलंग , बळवंत दाभणे , मंगेश लकडे , श्याम गावंडे , चंद्रशेखर खंडारे चालक नितेश तेलगोटे सायबर पो.स्टे . सागर धापड व रितेश वानखडे यांनी केली आहे .