Home मुंबई चारकोपगाव झोपडपट्टी वाशीयांचे तात्काळ पुनर्वसन करा अन्यथा जेलभरो आंदोलन : ए एस...

चारकोपगाव झोपडपट्टी वाशीयांचे तात्काळ पुनर्वसन करा अन्यथा जेलभरो आंदोलन : ए एस पी .जिल्हा अध्यक्ष सुरेश वाघमारे यांचा इशारा .

421

मुंबई (प्रतिनिधी ) . महामाया नगर येथील झोपडपट्टी वर झालेली तोडक कारवाई अत्यंत निदनीय असून चारकोप गाव कांदिवली पश्चिम मुंबई येथील महामाया नगर झोपडपट्टी बुलडोजर ने येथील बुद्ध मूर्तीची गलिच्छ कपड्याचा वापर करून बुद्ध विहार सुद्धा तोडण्यात आले झोपडपट्टी उध्वस्त केल्यानंतर लोक बेघर झाले असून

त्याना अन्न वस्त्र निवारा नसून उघड्यावर राहवं लागते आहे खिशात गावी जाण्यासाठी गाडी भाडे नसून कुठे जावे कसे राहावे असा प्रश्न पडला असून या ठिकाणी प्रशासना ने विधुत नळ पाणी सुविधा देऊन अनेक वर्षा पासून आपली राहुटी करून पोटाची खळगी भरत आपल्या मुलां बाळा ना शिक्षण देत असल्या ठिकाणी एका बिल्डर्स च्या इशाऱ्यावर ही तोडक कारवाई होत असते मात्र यावेळी त्या ठिकाणी संपूर्ण लोकांना पोलीस बळाचा वापर करून सोशल डिस्टंशिंग म्हणतात ना ते शासकीय अधिकारिच पायदळी तुडवत कारवाई करत होते कोरोना काळात ही कारवाई महाविकास आघाडी नावाला शोभणारी नसून येथील लोकप्रतिनिधी नी सुद्धा मूग गिळून या तोडक कारवाईला एक प्रकारे समर्थन दिल्यागत दिसून येत होते एकीकडे मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ तर्फे सुलभ सौचालय उभारले असून शासकीय सुविधा या झोपडपट्टीला मिळत असताना अचानक कायमची तोडक कारवाई कशी होते अगदी भिकाऱ्या सारखे जीवन एन कोरोना च्या काळात ही कारवाई माणुसकीला लाजविणारी तोडक कारवाई असून सरकारने त्वरित त्याना अन्न निवारा प्रदान करावे व ज्यांच्याकडे योग्य असे पुरावे असतील त्याना तरी पुनर्वसन करू जनतेची थट्टा थांब वावी अन्यथा आजाद समाज पार्टी उत्तर मुंबई जिल्ह्यातील कार्यकर्ते आक्रमक पवित्रा घेऊन जेलभरो आंदोलन करेल असा इशारा सुरेश वाघमारे यांनी प्रसिद्धी माध्यमातून दिला असून भाई चंद्रशेखर आजाद यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र अध्यक्ष राहुल प्रधान महिला प्रदेश अध्यक्ष नेहा ताई शिंदे महाराष्ट्र सचिव .कैलास जैस्वार व मुंबई प्रदेश अध्यक्ष दीपक हनवते यांच्या नेतृत्वात जेलभरो आंदोलन करणार असून दिनांक 9एप्रिल 2021.रोजी सकाळी या तोडक कारवाई ला कडाडून असा विरोध मुंबई अध्यक्ष दीपक हनवते .सुरेश वाघमारे यांनी केला असून यावेळी आकाश ओव्हाळ विजय बनसोडे अर्जुन गायकवाड अभिलाष रेड्डी सह आजाद समाज पार्टी चे पदाधिकारी उपस्थित होते . महाविकास आघाडी सरकार ने तात्काळ तेथील रहिवाश्यांच्या पुनर्वसन करून त्याना मूलभूत सुविधा प्रदान कराव्यात अन्यथा आम्ही मोठे जनांदोलन उभारून जेलभरो करणार असून सरकारच्या हिटलर शाहीला आम्ही मुळीच घाबरणार नाही असे सुरेश वाघमारे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना ठाकरे सरकारला इशारा दिला आहे