अमीन शाह ,
बुलडाणा ,
देऊलगावराजा येथील घटना ,
पोलीस आले पळा पळा पोलिसांना पाहून तो ही पळाला मात्र खड्ड्यात पळून गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी 2 वाजता देऊलगावराजा येथे गीतांजली टॉकीज परिसरात घडली या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार येथील गीतांजली टॉकीज परिसरात काही युवक गप्पा करीत उभे होते तिथे अमोल सर्जेराव मुख्यदल 30 हा पण उभा होता अचानक तिथे पोलिसांची गाडी येतांना दिसली व पळापळ सुरू झाली पोलिसांना पाहून पळताना अमोल हा खड्ड्यात कोसळला व गंभीर जखमी झाला पोलिसांनी त्यास उचलून ग्रामीण रुग्णालयात भरती केले त्यास जास्त मार लागल्या मूळे पुढील उपचारार्थ त्यास जालना येथे दाखल करण्यात आले असून तेथे त्याच्यावर उपचार केले जात आहे या घटने वरून मागच्या लोकडाऊन ची भीती आजही कायम असल्याचे दिसत आहे ,