१० ते १५ दिवसात आष्टी ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध होणार रुग्णवाहिका
ईकबाल शेख
वर्धा – तळेगांव (शा.पं.) :-आष्टी तालुक्यातील नागरीकांकरीता ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे रुग्णवाहीकेची नितांत गरज असतांना माजी आमदार अमर काळे यांनी पालकमंत्री सुनील केदार याच्याकडे सातत्याने पाठपुरावा करुन आष्टी तालुक्याकरीता रुग्णवाहीका मंजुर करवुन घेतली. सदर रुग्णवाहिका खनिकर्म विकास निधि अंतर्गत मंजुर झाली असुन रुग्णवाहीकेस प्रशासकीय मान्यता मिळाली असुन येत्या १० ते १५ दिवसात आष्टी ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाही उपलब्ध होणार असल्याचे माजी आमदार अमर काळे यांनी सांगीतले.
आष्टी तालुक्यात १०८ हि एकमेव रुग्णवाहीका आहे परंतु ती रुग्णवाहिका तळेगांव (शा.पं.) येथे आहे. आष्टी तालुका हा लोकसंख्येच्या दृष्टीने मोठा तालुका असुन तालुक्यातील बहुतांश गावे हि जंगलव्याप्त आहे. आष्टी हे तालुक्याचे गांव असुन येथे सुसज्य असे ग्रामीण रुग्णालय आहे परंतु येथे स्वतंत्र रुग्णवाहीकाच नाही त्यामुळे एखादे वेळेस तालुक्यातील जंगलव्याप्त गावातील एखाद्या रुग्णावर तातडीने रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आल्यास त्यांना सर्वप्रथम वेळेवर खाजगी वाहनाची व्यवस्था करावी लागते वाहन उपलब्ध झाल्यानंतर तो रुग्ण तालुक्यातील रुग्णालयात पोहचतो. यामध्ये कधी कधी रुग्ण रुग्णालयात पोहचण्याद मोठा विलंब सुद्धा होतो. तेव्हा उपचारा अभावी रुग्ण दगावतात सुद्धा या सर्व बाबीचा विचार केल्यास आष्टी ग्रामीण रुग्णालयात स्वतंत्र रुग्णवाहिका असणे गरजेचे होते. परंतु मागील काहि वर्षापासुन आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेची येथील नागरीकांची मागणी होती परंतु रुग्णवाहिजा मिळाली नव्हती.सध्या जिल्हासह तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.तेव्हा आष्टिसह तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्याकरीता तालुक्यातील जनतेची अडचन अोळखुन माजी आमदार अमर काळे यांनी पालकमंत्र्याकडे वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर आष्टी तालुक्याच्या दृष्टीने ग्रामीण रुग्णालय आष्टी करीता खनिज विकास निधी मधुन रुग्णवाहिका मंजुर झाली असुन प्रशासकिय मान्यता सुद्धा मिळाली आहे. तर येत्या १० ते १५ दिवसात आष्टी ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णवाहिका उपलब्ध होणार असुन रुग्णवाहिका खरेदीकरीता परिपत्रक पारीत करण्यात आले आहे.