Home मराठवाडा वयफल्यग्रस्त शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

वयफल्यग्रस्त शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

172

दुःखद घटना

सययद नजाकत

बदनापूर / जालना , दि. १९ :- डोक्यावर तीन लाखाचे कर्ज,मुलीच्या लग्नाची चिंता आणि निसर्गाची सतत अवकृपा होत असल्याने शेतात नापिकीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना बदनापूर तालुक्यातील सागरवाडी घडली असून कचरूसिंग दिवानसिंग जारवाल वय 40 वर्ष असे शेतकऱ्याचे नाव आहे .

बदनापूर तालुक्यातील कचरूसिंग जारवाल यांना 1 हॅकटर शेती सागरवाडी शिवारात असून त्यानी बॅक ऑफ महाराष्ट्र गेवराई बाजार शाखेतून 99000 कर्ज, महिंद्र फायनान्स बदनापूरचे 150000 कर्ज इतर बचत गट चे अंदाजे 40000 कर्ज शेती घेतलेले आहे ,परंतु मागील काही वर्षांपासून सतत निसर्गाची अवकृपा होत असल्याने शेतीतील उत्पन्न मिळत नसल्याने व शेतात खर्च केलेली रक्कम देखील उत्पन्नातून मिळत नसल्याने घेतलेले कर्ज कसे फेडावे असा प्रश्न सतत भेडसावत असल्याने आणि मुलीच्या लग्नाचा विषय जवळ येत असल्याने चिंताग्रस्त झालेल्या कचरूसिंग जारवाल यांनी 18 जानेवारी रोजी विष प्राशन केले असता त्यांना उपचारासाठी औरंगाबाद घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले दरमयन उपचार सुरू असताना 19 जानेवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला .

केवळ कर्जामुळे त्रस्त झाल्याने जारवाल यांनी आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली आहे. मृत शेतकरी कचरूसिंग जारवाल यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी असा परिवार असून मुलगा 10 वी ला आहे तर मुलगी बारावी ला शिक्षण घेत आहे .