राजेश एन भांगे
सध्या कोरोणा महामारीने महाराष्ट्रात चांगलेच हात पाय पसरले असुन या महमारीने नांदेड जिल्ह्यास सुध्दा मोठ्या प्रमाणात ग्रासले आहे.
देगलूर येथील नागरिकांच्या अडिअडचणीत व तसेच सामाजिक कार्यात आपली बांधिलकी जोपासत नेहमीच अग्रेसिव्ह असणारे संघटक श्रीराम जन्मोत्सव समिती व विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल देगलूर यांच्या मार्फत आजच्या श्रीराम नवमी (जन्मोत्सव) व हिंदू एकता दिवस या पवित्र दिवसाचे औचित्य साधून यावेळी श्रीरामाच्या भव्य मुर्तीस पुष्पहार घालून आरती करण्यात आले.
व त्या नंतर देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटर येथील कोरोणा रूग्णांन साठी गरम पाण्याच्या वाफेच्या मशीनचे वाटप करण्यात आले.
तरी या उपक्रमा वेळी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार, विश्व हिंदू परिषदेचे गिरीश वझलवार, तालुका आरोग्य अधिकारी आकाश देशमुख, भाजपचे शहराध्यक्ष अशोक गंदपवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अविनाश निलमवार, नगरसेवक प्रतिनिधी नितेश पाटील भोकसखेडकर, अजय वानखेडे, सरपंच संतोष पाटील गोजेगावकर, श्रीराम जन्मोत्सव समिती चे माजी सरपंच सुरेश मिसाळे, नगरसेवक प्रशांत दासरवार, बस्वराज पंचडे, ओमप्रकाश हंगरगेकर, गुरुडे सर, संजय दाचावार, अजय कडलवार, श्रीकांत पाटील वन्नालीकर, सुमित सरसंबे, राजेश आऊलवार, साई गंदपवार, अरुण आऊलवार, गजानन इंदुरकर, बाबुराव सावळे, जयवर्धन कांबळे, मुकुंद भुताळे, गंगाधर दाऊलवार, उमाकांत मुंडकर, अनिल कसलवार, विशाल अमृतवार, अर्जुन वणप्रतीवार, दत्ता टाकले, आदिनाथ अटपलवार, बालाजी गंदपवार, अभी कोंडेकर, गोपाळ मैलागिरे, शुभम बामणीकर आदी रामभक्त यावेळी उपस्थित होते.