Home नांदेड माहूर संविधान बचाओ संघर्ष समिति च्या वतीने गोरगरीब व बेरोजगार लोकांना अन्न...

माहूर संविधान बचाओ संघर्ष समिति च्या वतीने गोरगरीब व बेरोजगार लोकांना अन्न धान्य किटचे वाटप.

453

मजहर शेख,

नांदेड/माहूर,दि,१:- मुस्लिम आणि संविधान बचाओ संघर्ष समिति च्या वतीने आज जामा मस्जिद माहुर येथे covid 19 चा प्रार्दुभाव वाढल्याने काही नागरिक बेरोजगार झाल्याने, यामध्ये मुस्लिम व हिंदू समाज असून माहूर शहरातील व परिसरातील गावातील सदका जमा करून याच सदक्याच्या रक्कम ने गरीब व बेरोजगार लोकांना अन्न धान्य (अनाज) किटचे वाटप प्रशासन अधिकारि यांच्या उपस्थितीत करण्यात आले. जामा मस्जिद माहुर आणि संविधान बचाओ संघर्ष समितिच्या वतीने माहुर येथील covid 19 केयर सेंटर मध्ये चार कूलर भेट देण्यात आले। या वेळी तहसीलदार राकेश गिड्डे,गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे,तालुका आरोग्य अधिकारी साहेबराव भिसे,पोलीस निरीक्षक नामदेव रिठे,सीडीपीओ विशाल सिंग चव्हाण,नगरपंचायत अधीक्षक वाघ, डॉ.आंबेकर, पत्रकार नंदू संतान, प्रसिद्ध व्यापारी बाबूलाल सेठ जयस्वाल यावेळी उपस्थित होते.!