Home विदर्भ  यवतमाळ 24 तासात 1239 जण पॉझेटिव्हसह 991 कोरोनामुक्त तर मृत्यु 26

 यवतमाळ 24 तासात 1239 जण पॉझेटिव्हसह 991 कोरोनामुक्त तर मृत्यु 26

402

जिल्ह्यात आतापर्यंत 50 हजारांच्यावर कोरोनामुक्त

Ø बरे होण्याचे प्रमाण 85.66 टक्के

       यवतमाळ, दि. 5 : एकीकडे जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असला तरी बरे होणा-या रुग्णांचे प्रमाणसुध्दा लक्षणीय आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत 58715 जणांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. विशेष म्हणजे यातून तब्बल 50299 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. बरे होण्याची ही टक्केवारी जिल्ह्यात 88.66 आहे. 

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार बुधवारी एकूण 7300 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 1239 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 6061 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. तसेच गत 24 तासात जिल्ह्यात 991 जण कोरोनामुक्त झाले असून एकूण 26 मृत्यु झाले. यात इतर जिल्ह्यातील एका मृत्युचा समावेश आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 17 मृत्यु, डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये दोन आणि खाजगी रुग्णालयात सात मृत्यु झाले आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्यात 7017 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2589 तर गृह विलगीकरणात 4428 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 58715 झाली आहे. 24 तासात 991 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 50299 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1399 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 13.07 , मृत्युदर 2.38 आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 38, 17 वर्षीय पुरुष व 70 वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील 55 वर्षीय महिला, मारेगाव येथील 56 वर्षीय पुरुष, तालुक्यातील 60, 61 वर्षीय पुरुष, बाभुळगाव येथील 84 वर्षीय महिला, उमरखेड येथील 70 वर्षीय पुरुष, तालुक्यातील 60 वर्षीय महिला, दिग्रस येथील 55 वर्षीय महिला, तालुक्यातील 60 वर्षीय पुरुष, घाटंजी तालुक्यातील 67 वर्षीय पुरुष, पांढरकवडा तालुक्यातील 57 वर्षीय पुरुष, झरी तालुक्यातील 51 वर्षीय पुरुष, राळेगाव तालुक्यातील 54 वर्षीय महिला आणि वाशिम जिल्ह्यातील 45 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यातील डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये मृत झालेल्यांमध्ये राळेगाव येथील 76 वर्षीय पुरुष व पुसद येथील 56 वर्षीय पुरुष आहे. तर खाजगी रुग्णालयात यवतमाळ येथील 65 वर्षीय पुरुष, मारेगाव येथील 75 वर्षीय महिला, वणी येथील 60 वर्षीय पुरुष, पांढरकवडा येथील 76 वर्षीय पुरुष, दारव्हा येथील 67 वर्षीय पुरुष, महागाव येथील 65 वर्षीय पुरुष आणि आर्णि येथील 62 वर्षीय पुरुषाचा मृत्यु झाला.

            बुधवारी पॉझेटिव्ह आलेल्या 1239 जणांमध्ये 745 पुरुष आणि 494 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 207 पॉझेटिव्ह रुग्ण, दिग्रस 200, वणी 193, पांढरकवडा 147, दारव्हा 73, मारेगाव 65,  नेर 64, पुसद 64, उमरखेड 48, महागाव 45,  घाटंजी 42,  कळंब 39,  आर्णि 19, झरीजामणी 14, बाभुळगाव 7, राळेगाव 6 आणि इतर शहरातील 6 रुग्ण आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 449076 नमुने पाठविले असून यापैकी 445641 प्राप्त तर 3435 अप्राप्त आहेत. तसेच 386926 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

जिल्ह्यातील रुग्णालयात असलेल्या बेडची उपलब्धता : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 575 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 2 बेड शिल्लक आहेत. जिल्ह्यातील सहा डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये एकूण 360 बेडपैकी 191 रुग्णांसाठी उपयोगात, 169 बेड शिल्लक, जिल्ह्यातील 34 कोव्हीड केअर सेंटरमध्ये एकूण 2723 बेडपैकी 1245 उपयोगात, 1478 शिल्लक आणि 28 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1044 बेडपैकी 701 उपयोगात तर 343 बेड शिल्लक आहेत.

18 ते 44 वयोगटातील 1850 जणांचे लसीकरण : जिल्ह्यात 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली असून मंगळवारपर्यंत एकूण 1850 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात यवतमाळ शहरातील पाटीपुरा येथील केंद्रावर 375 जणांचे लसीकरण, लोहारा येथील केंद्रावर 357, पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात 367, दारव्हा येथील उपजिल्हा रुग्णालयात 375 आणि पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात 376 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.