कर्जत: (प्रतिनिधी) – पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. आज देशात कोरोना सारख्या महामारीच्या व लाॅॅकडाउन परिस्थितीत पत्रकार जीवाची पर्वा न करता वृत्तसंकलन करण्याचे काम करीत असताना अनेक पत्रकारांना कोरोना सारख्या संसर्गाच्या विळख्यात सापडुन मृत्यू झाला आहे मात्र अशा या पत्रकार चौथ्या स्तंभाला शासनाने तसेच लोकप्रतिनिधीनी लाॅकडाऊन परिस्थितीत कुठलीही मदत केलेली नाही त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याची सुरक्षिततेसाठी कुठलीही काळजी आजपर्यंत काळजी घेतली जात नाही.मात्र तरी सुद्धा कसलीही अपेक्षा न बाळगता पत्रकार आपले कर्तव्य बजावत आहेत.या गोष्टीची जाणीव एका सेवाभावी सामाजिक संस्थेला झाली आणि त्यांनी पत्रकारांच्या कर्तव्याची दखल घेतली.
रायगड जिल्ह्यांतील कर्जत तालुक्यात प्रथमच नावाजलेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविणाऱ्या सामाजिक अपराध नियंत्रण एवं भ्रष्टाचार विरोधी या अग्रेसर संस्थेने तालुक्यातील पत्रकारांच्या आरोग्यासाठी माॅस्क व सॅनेटायझरचे वाटप केले.विशेष म्हणजे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सोशल डिस्टन्सचे पालन करीत कर्जत तालुक्यातील पत्रकारांच्या घरी जाऊन त्यांना सॅनेटायझर व माॅस्कचे वाटप केले.सामाजिक अपराध नियंत्रण एव भ्रष्टाचार विरोधी संस्थेने केलेल्या स्तुत्य उपक्रमाबद्दल पत्रकारांनी आभार मानले.
सदर कार्यक्रम सामाजिक अपराध नियंत्रण एव भ्रष्टाचार विरोधी संस्था व मनुष्री एज्युकेशन फाउंडेशन यांच्या वतीने घेण्यात आला यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष ज्ञानेश्वर साळोखे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष किशोर शितोळे, रायगड जिल्हा पदाधीकारी कु. सुप्रेश साळोखे, सुभाष ठाणगे, उत्तम ठोंबरे, कर्जत तालुका उपाध्यक्ष श्री रतन लोंगळे,सेल अध्यक्ष शांताराम मिरकुटे, प्रसिध्दी प्रमुख मोतीराम पादिर, रमेश ताकसांडे, मिलिंद डुकरे, गणेश केवारी,आदी उपस्थित होते