सुमारे 22 ते 23 दिवस कोरोना या आजाराशी लढता लढता आज खासदार राजीवजी सातव साहेब यांनी पुणे येथील जहांगीर हॉस्पिटल मध्ये अंतिम श्वास घेतला.ते 4 वेळा संसदरत्न पुरस्काराचे मानकरी होते.सर्व समाजाला सोबत घेऊन सर्वांचा विकास साधण्याचा ते सतत प्रयत्न करत असत.सर्व पक्षीय नेत्यांशी त्यांचे मैत्रीपूर्ण नाते समंध होते.सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवणारा व जात,धर्म ह्या पलीकडे जाऊन सर्वांचा विकास करणारा उमदा नेता काळाच्या पडद्या आड गेला.त्यांचे कार्याचा झंझावात जिल्हा ते राष्ट्रीय पातळीवर होता.एक दिलखुलास,निरागस,तरुण ,अभ्यासु व्यक्तिमत्व म्हणून ते चिरपरिचित होते.खासदार राजीव सातव ह्यांचे जाण्याने एकप्रकारे जिल्ह्याचे व राज्याचे नव्हे तर देशाचे खूप मोठे नुकसान झाले आहे.दिवंगत खासदार राजीवजी सातव साहेब यांचे परिवाराला व सर्व जनतेला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो व त्यांचे आत्म्यास चिर शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
शोकाकुल
पराग पिंगळे
जिल्हा प्रमुख
शिवसेना यवतमाळ जिल्हा