Home मराठवाडा अंबड तालुक्यात दिवसा ढवळ्या वाळू उपसा महसूल विभागाचे दुर्लक्ष

अंबड तालुक्यात दिवसा ढवळ्या वाळू उपसा महसूल विभागाचे दुर्लक्ष

205

राजेंद्र गायकवाड

जालना – अंबड तालुक्यातील कानडगाव येथील नदीमध्ये राजरोसपणे होणाऱ्या वाळू उपशाकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.या वाळूमाफियांना एका राजकीय पुढाऱ्याचा वरदहस्त असून, शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविणाऱ्या या वाळू माफियावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. राजकीय पाठबळामुळेच या प्रकरणात प्रशाशनाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याची चर्चा आहे.नदीतील बेकायदेशीर वाळू उपसा करण्यामागे सत्ताधारी राजकीय पुढाऱ्याचा हात असल्याचे पंचक्रोशीत चर्चिले जात आहे. राजरोसपणे होणाऱ्या बेकायदेशीर वाळू उपशाबाबत प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना कायद्यावर बोट ठेवून महसूल विभागाकडून चांगलेच हैराण केले जाते. अनेक वेळा लोकांना नाडले जाते. परंतु शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविणाऱ्या या वाळूमाफियावर कोणतीही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे अंबड तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू उपसा केला जात आहे. या चोरट्या वाळूतून वाळूमाफिया कोट्यवधी रुपये नफा मिळवत आहेत. परंतु शासनाच्या तिजोरीत महसूल गोळा होत नाही. काही तालुक्यातील वाळू उपसा बंद आहे.परंतु अंबड तालुक्यातील कानडगाव येथे मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याचे समोर आले आहे.