Home जळगाव पुर्णानंद’ ने आपल्या आनंदसाठी केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

पुर्णानंद’ ने आपल्या आनंदसाठी केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

1179

 

महाराजने मुलीची छेड काढल्याने फैजपूरात खळबळ

 

रावेर (शरीफ शेख)

जळगाव जिल्ह्यातील
फैजपूर येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा येथीलच एका धार्मिक प्रवचनकार महाराजाने विनयभंग केल्याची घटना घडली असून सदर महाराज ला चांगलाच चोप देखील देण्यात आला आहे. या घटनेमुळे फैजपूर व परिसरात खळबळ उडाली आहे.दरम्यान रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया फैजपूर पोलीस स्टेशन मधे सुरू होती.

सविस्तर वृत्त असे की फैजपूर येथील खंडोबा वाडी च्या मागील बाजूस आपल्या पत्नीसह वास्तव्यास असलेल्या पुर्णानंद महाराज नामक ३५ ते ४० वर्षीय धार्मिक प्रवचनकार महाराजाने त्याच परिसरात राहणाऱ्या एका १४ ते १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना काल उघडकीस आली.

व्यक्तीने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. त्याला चोप देऊन फैजपूर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.सदर अल्पवयीन मुलीच्या आजोबांच्या दुचाकी विक्री विषयी चर्चा करण्यासाठी हा महाराज गेला असता त्याठिकाणी त्याने या अल्पवयीन मुलीची छेड काढली.मुलीने ताबडतोब आपल्या कुटुंबातील सदस्यांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली असता या पुर्णानंद नामक महाराज ला चांगलाच चोप देऊन फैजपूर पोलीस स्टेशन ला पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.
या गुन्ह्यातील पिडीत मुलगी अल्पवयीन असल्याने नियमानुसार महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत याबाबत इन कॅमेरा मुलीचा जबाब घेऊन गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत फैजपूर पोलीस स्टेशन मधे सुरू होती.मुलगी अल्पवयीन असल्याने बाल अत्याचार विरोधी (पोक्सो) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सदर पुर्णानंद नामक महाराज याने याअगोदर देखील २-३ वेळेस अशा प्रकारचे अश्लील व असभ्य कृत्य केले असून काही प्रतिष्ठित लोकांनी मध्यस्थी केल्यानंतर त्यावेळी प्रकरण जास्त न वाढता मिटविण्यात आले होते.काही दिवसांपूर्वी तर या ‘पुर्णानंद’ ने आपल्या ‘आनंदासाठी’ एका तरुणीस प्रेमाच्या जाळ्यात अडकवून चक्क पळवून आणले असून नंतर त्याने तिच्यासोबत विवाह करुन संसार देखील थाटला आहे.मात्र तो विकृत व्यक्ती इतक्यावरच थांबला नाही तर काल पुन्हा त्याने असाच विकृत प्रकार करण्याचा प्रयत्न केला आणि चिडलेल्या लोकांनी देखील त्यास चांगलाच बदडून काढला असल्याचे बोलले जात आहे.
आता या प्रकरणात फैजपूर पोलीस अधिकारी कोणती कारवाई करणार? या विकृत महाराज वर कोणकोणत्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात येईल? सदर अल्पवयीन मुलीचे पालक कोणती भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असून या विकृत मानसिकतेच्या व्यक्तीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता नागरिकांमधून होऊ लागली आहे.