अमीन शाह
आधार कार्ड हे एक महत्त्वाचं कागदपत्रं आहे.UIDAI ने आधार अॅपचं एक नवं व्हर्जन लाँच केलं आहे. या नव्या अॅपचं नाव आहे mAadhaar. हे अॅप अँड्रॉइड आणि IOS युजर्स सोप्या पद्धतीने डाउनलोड करू शकतात. हे अॅप अँड्रॉइड आणि अॅपल प्ले स्टोअरमधून डाउनलोड होतं. तुम्ही या अॅपच्या मदतीने आधार कार्ड रिप्रिंट करण्याची विनंती करू शकता. आधार रिप्रिंटसाठी तुम्हाला 50 रुपये सर्व्हिस चार्ज द्यावा लागेल. तुम्ही कार्डासाठी अर्ज दिल्यानंतर 15 दिवसांच्या आत तुम्हाला कार्ड मिळेल. फक्त नवं आधार कार्ड तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड पत्त्यावरच पाठवलं जाईल.
नव्या अॅपमध्ये मिळणार या सुविधा
नवं आधार अॅप वारण्याच्या दृष्टीने खूपच सुलभ आहे. यामध्ये ऑफलाइन KYC , QR कोड स्कॅन, रिप्रिंटची ऑर्डर देणं, अॅड्रेस अपडेट करणं, आधार व्हेरिफाय करणं, ई मेल व्हेरिफाय करणं, UID रिट्रीव्ह रिक्वेस्ट अशी कामं सोप्या पद्धतीने करता येतील.
या अॅपच्या माध्यमातून ऑनलाइन रिक्वेस्टचं स्टेटस चेक करता येईल.