घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे
जालना – महिनाभरापूर्वी कोरोना पाॅझिटीव्ह निघालेल्या इसमाने कोरोनाशी दोन हात करून कोरोना विरूद्धची लढाई जिंकली परंतु हे बहुधा नियतीला मान्य नसावे , सदाबहार व्यक्तीमत्व असलेले राजाटाकळी येथील रहिवाशी आणि मत्स्योदरी सहकारी सुतगिरणी मध्ये लिपिक पदावर कार्यरत श्रीरंग सर्जेराव आर्दड आबा यांना अखेर काळाने गाठले. रविवारी,३० मे रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय ४९ वर्षे होते , त्यांच्या पश्चात आई,पत्नी, एक मुलगा, दोन मुली,जावयी, एक भाऊ असा मोठा परिवार आहे.स्वस्त धान्य दुकानदार आप्पासाहेब आर्दड यांचे चुलत भाऊ तर बळीराम आर्दड यांचें ते मोठे बंधू होत .त्यांच्यावर संध्याकाळी ९ वाजता गोदावरी तीरावरील स्मशानभुमीत अंतीम संस्कार करण्यात आले.