जालना- लक्ष्मण बिलोरे
राष्ट्रवादी काँग्रेस २२ व्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष महेबुब भाई शेख यांच्या आदेशानुसार, मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक कोटी पत्र पाठवण्याचा संकल्प केला आहे ,या आदेशाचे पालन करून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष कपिल भैय्या आकात यांनी जालना जिल्ह्यातुन पाच लाख पत्र पाठवण्याचा संकल्प केला आहे .
याची सुरुवात उद्या दि १० जून रोजी परतुर येथुन होणार आहे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पदाधिकारी यांची महत्वाची बैठक आकात यांच्या जयभवानी निवास ,जयभवानी कॉलनी येथे बोलावण्यात आली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जारी पत्रकात म्हटले आहे.