Home विदर्भ पती तुरूंगात, मुलीचे लग्न पुढे ढकलले, पत्नीची आत्महत्या…!

पती तुरूंगात, मुलीचे लग्न पुढे ढकलले, पत्नीची आत्महत्या…!

1001

अकोला / पातूर – पातूर तालुक्यातील चांनी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जांब येथील रामचंद्र लठाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी चांनी पोलिसांनी एम पी डी ए अंतर्गत कार्यवाही केली होती. या कार्यवाही नंतर सदर रामचंद्रला एक वर्षासाठी तुरूंगात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

जेव्हा ही कारवाई करण्यात आली, त्या दिवसापासून अवघ्या काही दिवसांवर या इसमाच्या मुलीचे लग्न ठरले होते. परंतु मुलीचे वडील पोलिसांच्या कारवाईत तुरुंगात गेल्याचे कळल्यानंतर मुलीचा विवाह पुढे ढकलण्यात आला. अशा परिस्थितीत सदर इसमाच्या पत्नीने या सर्व घटनांची धास्ती घेऊन शनिवारी दुपारी आत्महत्या केली.

ज्योती रामचंद्र लठाड, वय 35, असे या महिलेचे नाव असून गावाजवळच असलेल्या एका जंगलात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ही बाब समोर आल्यानंतर खळबळ निर्माण झाली. माहिती मिळताच चांनी पोलिस घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून पुढील कायदेशीर कार्यवाही करण्याचे काम पोलीस करीत आहेत.याप्रकरणी चांनी पोलिसांनी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.