मजहर शेख, नांदेड
नांदेड/किनवट, दि : २७ :- तालुक्यात मृग नक्षत्रात पाउस पडल्याने शेतक-यांनी सोयाबीनसह तत्सम पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात केली परंतु आता गेले १५ दिवस पावसाने दांडी मारल्याने शेतकरी राजा हतबल झाला आहे. परंतु शेतक-यांना त्यांचे वर्षभराचे अर्थचक्र चालवायचे असेल, तर पिक काढावेच लागेल त्यामुळे शेतक-यांवर ओढावलेल्या या संकट समयी किनवट तालुक्यातील सारखणी फार्मर प्रोड्युसर कंपनी ही शेतक-यांच्या मदतीला धावुन आली आहे.
ज्या शेतक-यांना त्यांच्या शेतात दुबार पेरणी करायची आहे त्यांच्या करिता ना नफा ना तोटा या तत्वावर “ट्रक्टर आमचे – डिझेल तुमचे” हि योजना आणली असुन यामुळे शेतक-यांना पेरणी करिता मोफट ट्रक्टर उपलब्ध करुन दिले जाणार आहे.
सारखणी फार्मर प्रोड्युसर हि तालुक्यातील सुमारे १२०० शेतक-यांनी एकत्र येत एफ.पी.ओ स्थापन केलीली स्वयंसहायता गट असुन या गटाने नुकतेच नाबार्ड करिता शेतक-यांचे माल विकत घेऊन ते शानाला प्रदाण करण्याचे काम अगदी उत्त्म रित्या केले आहे. तर नेहमी शेतक-यांच्या हिता करिता झटणा-यांया फार्मर स्वंय सहायता गटाने नुकतेच जिल्हाधिकारी व सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्या आहवानाला प्रतिसाद ते गाळ मुक्त तलाव व गाळ युक्त शेती योजने अंतर्गत तालुक्यातील विविध तलावातुन गाळ उपसा करुन आपल्या स्वंयसहायत्ता गटातील सभासद शेतक-यांच्या शेतामध्ये टाकुन त्यांच्या शेतीची कस वाढवण्याकरीता देखिल अनेक प्रयत्न केले आहे.
शेतक-यांच्या प्रश्ना विषयी तळमळ हि शेतक-यालाच असते त्यामुळे शेतकरी हा नेहमी नेहमी शासन किंवा इतर खाजगी यंत्रणेवर निर्भर न राहत तो स्वावलंबी राहावा या दृष्टीने तालुक्यातील १२०० शेतकरी एकत्र येऊन निर्माण केलेल्या या शेतकरी फार्मर प्रोड्युसर स्वंयसहायता गट ज्याला एफ पी ओ असे देखिल संबोधतात त्यांनी पुढाकार घेऊन शेतक-यांची मदत करायचे ठरवल्याने शेतक-यांनी सारखणी ता.किनवट येथिल कार्यालयाशी संपर्क साधुन सदर योजने चालाभ घेऊ शकता असे जाहीर केले आहे तर या बाबत स्वयंसहायता गटाचे अध्यक्ष फाजलाणी समद यांनी जास्तीत जास्त शेतक-यांनी लाभ घ्यावा व ज्यांना दुबार पेरणी करण्यची आवश्यकता वाटते त्यांनी देखिल लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.