Home महाराष्ट्र MPSCचा कारभार पाच वर्षांसाठी तुकाराम मुंडें सारख्या खमक्या अधिकाऱ्याच्या हातात द्या. तरच...

MPSCचा कारभार पाच वर्षांसाठी तुकाराम मुंडें सारख्या खमक्या अधिकाऱ्याच्या हातात द्या. तरच गरीबांची, प्रामाणिकपणे अभ्यास करणारी पोरं अधिकारी होतील.

2420

सौजन्य सोशल मिडिया

– इथं गरिबांना हिंमत नाही, मध्यमवर्गीयांना वेळ नाही आणि श्रीमंतांना गरज नाही.
जे घडत आहे, तो नशीबाचा भाग आहे म्हणून जगणारा असा आमचा सुशिक्षित समाज आहे..
शोषणाचे उत्तर मार्क्सने शोधले,
स्वातंत्र्याचे उत्तर गांधींनी शोधले,
लोकशाहीचे उत्तर आंबेडकरांनी शोधले,
शिक्षणाचे उत्तर फुलेंनी शोधले,
मुघलांना उत्तर शिवरायांनी शोधले
समाजसेवेचे उत्तर भगवानबाबानी शोधले,
आणि आता त्यांच्या पश्चात….
इथल्या मूठभर लोकांनी बहुजना समोर पुन्हा तेच प्रश्न निर्माण केले. शोषण, भूक, लोकशाही, शिक्षण, नोकरी…
शिकलेले लोक फक्त उत्तरे लिहू शकतात, उत्तरे देऊ शकत नाहीत ….
” शिक्षण-प्रबोधन-आरोग्य”