Home कोल्हापूर सासू सुनेचा वाद विकोपाला गेलं अन , विपरितच घडलं ???

सासू सुनेचा वाद विकोपाला गेलं अन , विपरितच घडलं ???

633

 

सासू वर उपचार सुरू ,

अमीन शाह ,

पोलीस हवालदार असणाऱ्या एका महिलेनं आपल्या वयोवृद्ध सासूवर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. या दुर्दैवी घटनेत 80 वर्षांच्या सासूबाई गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर कोल्हापूरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपदरादरम्यान जखमी सासूचा जवाब पोलिसांनी नोंदवून घेतला आहे. त्या माहितीच्या अधारे पोलिसांनी पोलीस हवालदार सुनेवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास शाहूपुरी पोलीस करत आहेत.
आशालता श्रीपती वराळे असं जखमी झालेल्या 80 वर्षीय सासूचं नाव असून त्या आपला मुलगा आणि सून यांच्यासोबत कसबा बावडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिसरात वास्तव्याला आहेत.
तर संगीता राजेंद्र वराळे (वय-51) असं संशयित सूनेचं नाव आहे. संशयित आरोपी संगीता वराळे या कोल्हापूर पोलीस दलात हवालदार पदावर कार्यरत आहेत. त्यांची सध्या पोलीस मुख्यालयात नेमणूक करण्यात आली आहे. संशयित संगिता वराळे आणि जखमी सासू आशालता यांच्या मागील काही वर्षांपासून कौटुंबीक वाद आहे.
सोमवारी मध्यरात्री किरकोळ कारणावरून पुन्हा हा वाद उफाळून आला. सासू-सूनामध्ये बाचाबाची झाल्यानं संतापलेल्या सूनेनं आपल्या सासूवर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिलं. या दुर्दैवी घटनेत सासू आशालता वराळे गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्या तोंडाला, मानेस, उजव्या हात आणि पायाला अनेक ठिकाणी भाजलं आहे. या घटना घडताच नातेवाईकांनी सासूबाईंना त्वरित रुग्णालयात उपचारासाठी हलवलं आहे.
खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना, पोलिसांनी त्यांचा जवाब नोंदवून घेतला आहे. या माहितीच्या अधारे पोलिसांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शाहूपुरी पोलिसांच्या पथकानं घटनास्थळी जावून पहाणी केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

फोटो काल्पनिक चित्र आहे ,