खळबळजनक घटना , “पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल”
अमीन शाह
चंद्रपूर , दि. २२ :- येथील एका वसतिगृहात बाराव्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यर्थ्यांने सतत होणाऱ्या लैंगिक अत्याचारा मूळे त्रस्त होऊन गळफास घेऊन वर्गातच आत्महत्या केलयाची घटना १८ जानेवारी रोजी उघडीस आली होती आज या अल्पवयीन पीडित मुलावर त्याच्या वर्ग मित्रांनीच बलात्कार केला होता ही बाब पोलीस तपासात उघड झाली आहे , उघळ झालेल्या या गंभीर प्रकरना मूळे जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे .
या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार येथील एका वसतिगृहात एक मुलगा बाराव्या वर्गात शिक्षण घेत होता गेल्या वर्ष भरा पासून काही मुले या गरीब मुलावर लैंगिक अत्याचार करून त्याला त्रास देत होते तो गप्प राहून हा त्रास निमूटपणे सहन करीत होता १५ जानेवारी रोजी पीडित मुलाचा वाढदिवस होता त्या रात्री सुदधा या टवाळखोर मुलांनी या पीडित मुलावर लैंगिक अत्याचार केला त्या मुळे या पीडित मुलाने वर्गातील अभ्यासिकेत गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली ही घटना घडल्या नंतर पोलीस तपासात मृतक मुलाची एक डायरी व १० पाना चा सुसाईड नोट सापडली त्या मुळे पोलिसांनी त्या मुलाच्या आत्महत्ये प्रकरणी ११ विधारथी व 3 हॉस्टेल कर्मचाऱ्यां वर पोस्को व भा , द , वि , ३७७ नुसार गुन्हा दाखल केला आहे घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र संताप वयकत केला जात आहे .