Home विदर्भ नागपुर येथील घरफोडीचे अट्टल सराईत चोरटे हिंगणघाट पोलीसांच्या जाळयात, हिंगणघाट –  डी.बी....

नागपुर येथील घरफोडीचे अट्टल सराईत चोरटे हिंगणघाट पोलीसांच्या जाळयात, हिंगणघाट –  डी.बी. पथकाची धडक कार्यवाही .

247

इकबाल शेख – वर्धा

रात्रदरम्यान हिंगणघाट येथील संत तुकडोजी वार्ड, हिंगणघाट येथे एकाच रात्री 1) उमेष उत्तम फुलकर 2) सिद्धार्थ काषिनाथजी गायकवाड 3) श्रीमती राणी विलास झाडे यांच्या 4) दिपक गायधने यांच्या घरी अज्ञात चोरटयांने घरफोडया केल्या असुन त्याबाबत पोस्टे हिंगणघाट येथे घरफोडीचे 3 गुन्हे दाखल करण्यात आले.
सदरची माहीती पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील पोहवा शेखर डोंगरे यांचे डी.बी. पथकाला पो.नि. संपत चव्हाण यांनी माहीती देवुन रवान केले. सदरची माहीती मिळताच लागलीच पोहवा शेखर डोंगरे यांचे पथक हिंगणघाट परिसरात रवाना होवुन आरोपी व चोरीचा मालाचा शोध घेत असता त्यांच्या पथकांनी आपले नेटवर्क चा फायदा घेत माऊली पार्क, नागपुर रोड, हिंगणघाट येथे पोहचुन दोन संषयीत इसमांना ताब्यात घेवुन त्यांची बारकाईनेे व कसुन चैकषी केली असता त्यांचे ताब्यातुन चोरीस गेलेल्या मालापैकी नगदी रक्कम, सोन्याचे दागिणे व जेन्ट्स घडयाळ जप्त करून त्यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली. त्यांचा मा. विदयमान कोर्टातुन 3 दिवस पि.सि.आर. प्राप्त झाल्याने त्यांच्याकडुन पि.सि.आर. काळात पोस्टे ला दाखल असलेल्या तिनही गुन्हयाचा चोरीस गेलेला माल सोन्याचे व चांदीचे दागिणे तसेच नगदी रक्कम असा एकुण जु.कि. 49,960 रू. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
सदर गुन्हयात अटक करण्यात आलेले आरोपी नामे 1) राहुल कमल माणिकपुरे वय 28 वर्शे रा. योगी अरविंद नगर, गली क्र. 10, यषोधरा चैक, नागपूर 2) नितेष अषोक गिरावकर, वय 20 वर्श, रा. गिट्टी खदान, आखरी बस स्टाफ, झोपडपट्टी, नागपूर यांच्या विरूद्ध नागपुर जिल्हा, भंडारा जिल्हा व चंद्रपुर जिल्यातील विविध पोलीस स्टेषनला सदर आरोपींता विरूद्ध चोरी, जबरी चोरी व घरफोडीचे 40 ते 45 गुन्हे दाखल असुन ते आरोपी पोस्टे रेकाॅर्ड वरील अट्टल गुन्हेगार म्हणुन नोंद आहे.
सदरची कामगीरी मा. श्री. प्रषांत होळकर, पोलीस अधीक्षक, वर्धा, मा. श्री. यषवंत सोळंके, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा, मा. श्री. दिनेष कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगणघाट, पो.नि. श्री. संपत चव्हाण, पोलीस स्टेषन, हिंगणघाट, यांचे मार्गदर्षनात डि. बी. पथकाचे पो.हवा. षेखर डोंगरे, नापोषि. निलेष तेलरांधे, सचिन घेवंदे, विषाल बंगाले, सचिन भारषंकर यांनी केली.