Home विदर्भ वुमेन्स अॅथलॅटिक्स शाखा यवतमाळच्या महिलांची उत्कृष्ट कामगिरी…!

वुमेन्स अॅथलॅटिक्स शाखा यवतमाळच्या महिलांची उत्कृष्ट कामगिरी…!

253

शोभा खडसे,शिला पेडणेकर,संजिवनी बर्वे यांना सुवर्णपदक प्राप्त….!!

सुकांत वंजारी

यवतमाळ , दि. २२ :- सांगली-मिरज येथे पार पडलेल्या महाराष्ट्र मास्टर अॅथलॅटिक्स चॅम्पियन २०१९ स्पर्धेत वुमेन्स अॅथलॅटिक्स शाखा यवतमाळच्या वतिने विवीध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांनी सुवर्ण पदक प्राप्त करित जिल्ह्याचे नाव उंचावले आहे.या स्पर्धेत यवतमाळ जिल्ह्यातुन ५० स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामध्ये यवतमाळ नर्सेस असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षा शोभाताई खडसे यांनी १०० मीटर धावणे या स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केले तर सार्वजनिक बांधकाम विभागातुन सेवानिवृत्त झालेल्या शोभाताई पेडणेकर यांनी १०० मीटर धावणे व ५ कि.मी. चालणे या स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केले तसेच नेटवर्किंग मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या संजीवनी बर्वे यांनी लांब उडी स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त करित जिल्ह्याचे नाव उंचावले आहे.

६ फेब्रुवारी रोजी मनिपुर येते होऊ घातलेल्या राष्ट्रीय अॅथलॅटिक्स चॅम्पियन स्पर्धेत या महिलांची निवड झाली असुन त्या स्पर्धेत नक्कीच उत्कृष्ट कामगिरी करणारं असल्याचा आत्मविश्वास त्यांना आहे.त्यांनी केलेल्या सुवर्ण पदकाच्या कामगिरी बद्दल त्याचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले आहे.